शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१२ रुग्णालयांत १०६ पदे रिक्त

By admin | Updated: August 8, 2016 00:41 IST

सितम सोनवणे , लातूर ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा आधारवड असलेल्या उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा फटका सामान्य रुग्णांना बसत आहे.

सितम सोनवणे , लातूरग्रामीण भागातील रुग्णांना मोठा आधारवड असलेल्या उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा फटका सामान्य रुग्णांना बसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदभरतीकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णांची मात्र गैरसोय वाढतच आहे. लातूर जिल्ह्यात १० ग्रामीण व २ उपजिल्हा रुग्णालये आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ६७३ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ५६७ पद भरती करण्यात आली आहे. नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यात एक स्त्री रुग्णालय, १० ग्रामीण रुग्णालय, २ उपजिल्हा रुग्णालय यासोबत ट्रामा विभाग , फिरते रुग्णालय पथकातंर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. त्याअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ (वर्ग -१) अंतर्गत सामान्य राज्य सेवा गटातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची १८ पदे मंजूर करण्यात आली आहेत़ मात्र प्रत्यक्षात १४ पदे भरण्यात आली आहेत. लातूर शहरातील स्त्री रुग्णालयातील एक, ग्रामीण रुग्णालय मुरुड, जळकोट येथील प्रत्येकी १ तर अंधत्व नियंत्रण कार्यक्रम लातूर येथील १ असे एकूण चार वैद्यकीय अधीक्षकांची पदे रिक्त आहेत़ तसेच याच रुग्णालयातील वर्ग-२ अतर्गत असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८ पदे रिक्त आहेत. शासनाने ८१ जागांची मंजुरी दिलेली आहे. मात्र ७३ जागा भरण्यात आल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्राची आवड असलेल्या बहुतांश डॉक्टरांना कागदोपत्री मेळ घालण्याचे काम अधिक असल्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर शासकीय सेवेत रमत नाहीत. परिणामी, ग्रामीण रुग्णालयात अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडून फारसा उत्साह नाही.