शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील १०३ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 19:45 IST

Gram Panchayat election निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार जिल्ह्यातील १ हजार १३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

ठळक मुद्देहदगाव, कंधार आणि भोकर तालुक्यांनी जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले.जिल्ह्यातील उर्वरित ९१० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

नांदेड- जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गटातटाच्या राजकारणामुळे अनेक गावांत या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. असे असताना १०३ ग्रामपंचायतींनी मात्र ही निवडणूक बिनविरोध केली आहे. आता उर्वरित ९१० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. १५ जानेवारी रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. 

निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार जिल्ह्यातील १ हजार १३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतीत तालुकास्तरावर मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी कोरोनाच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली करण्यात आली. ग्रामीण भागातील राजकारणाचा पाया असलेल्या ग्रामपंचायतींची सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनीही कंबर कसली आहे. शेकडोंच्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने चुरस निर्माण झाली होती; परंतु गावातील एकोपा टिकून रहावा, वादविवाद होऊ नये यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. काही ठिकाणी त्याला यशही आले. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १०३ ग्रामपंचायती बिनविराेध निघाल्या आहेत. यात नांदेड तालुक्यातील ७, अर्धापूर ६, भोकर १२, मुखेड ५, हदगाव १३, हिमायतनगर ३, किनवट २, धर्माबाद ३, उमरी ९, बिलोली ४, नायगाव ५, देगलूर ८, मुखेड ६, कंधार १३ आणि लोहा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींचा समावेश आहे. हदगाव, कंधार आणि भोकर तालुक्यांनी जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 

जिल्ह्यातील उर्वरित ९१० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अनेक ठिकाणी तरुण या निवडणुकीत उतरले आहेत. तर कुठे गटातटाच्या राजकारणामुळे पॅनल उभे राहिले आहेत. जुन्या लोकांना बाजूला सारून नवखी मंडळी राजकारणात आली आहे. त्यामुळे अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. 

टॅग्स :Nandedनांदेडgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक