शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींची कामे बांधकाम विभागाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:11 IST

महाराष्टÑ शासनाने विशेष बाब म्हणून औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने विशेष बाब म्हणून औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला. हा निधी मनपाच्या खात्यात येण्यापूर्वीच जोरदार वाद सुरू झाले आहेत. दररोज मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रारी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सर्व निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्यास आपले कसे होणार, या भीतीपोटी पदाधिकाºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी काही पदाधिकारी तातडीने मुंबईकडे रवाना झाले.मंत्रालयात औरंगाबाद महापालिकेची प्रतिमा खूप काही चांगली नाही. यापूर्वी शासनाने विशेष बाब म्हणून औरंगाबादला २४ कोटींचा निधी दिला होता. या निधीतील रस्त्यांची कामे तीन वर्षांनंतरही पूर्ण झालेली नाहीत. भाजप पदाधिकाºयांच्या आग्रहावरून मागील महिन्यात शासनाने १०० कोटींचा निधी मंजूर केला. या निधीत शहरातील मुख्य रस्ते गुळगुळीत करा असा सल्ला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानंतर रस्त्यांची यादी तयार करण्यावरून महापालिकेत शिवसेना, एमआयएम व इतर पक्षांनी कुरघोडी सुरू केली. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मुख्यमंत्री कार्यालयाकडे सतत तक्रारी सुरू झाल्या.मागील आठवड्यात शासनाने १०० कोटींतील रस्त्यांच्या यादीला तांत्रिक मान्यता दिली. अद्याप निधी दिलेला नाही. या यादीवरून एमआयएमसह इतर राजकीय पक्षांनी जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. एमआयएमने तर सोमवारी खंडपीठात जाण्याचा इशारा देऊन टाकला. दररोज प्रसारमाध्यमांमध्येही १०० कोटींच्या रस्त्यांवर बातम्या प्रकाशित होऊ लागल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याच्या हालचाली सुरू केल्याचे कळते. शासन सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी देणार असल्याची कुणकुण लागताच भाजपचे दोन पदाधिकारी त्वरित मंगळवारी मुंबईला रवाना झाले. शासनाने निधी मनपालाच द्यावा असे प्रयत्न पदाधिकाºयांकडून सुरू झालेआहेत.