लातूर : स्वित्झरलँड मधील जिनीव्हा येथे देवकणांच्या शोधासाठी सर्वात मोठा वैज्ञानिक उपक्रम सुरू आहे़ त्यात १० हजार शास्त्रज्ञ व हजारो इंजिनिअर्स, तंत्रज्ञ सहभागी झाले असल्याची माहिती टाटा मुलभूत संशोधन संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ़ शशी दुगड यांनी येथे गुरूवारी दिली़ दयानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित इन्स्पायर शिबिरात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते़ जिनीव्हा येथील या वैज्ञानिक उपक्रमात भारतीय शास्त्रज्ञांचे मोठे योगदान आहे़ या प्रयोगातून कर्करोगावरील उपचारात अमुलाग्र बदल होऊ शकतो़ देशाच्या संरक्षण व्यवस्थेलाही याचा उपयोग होऊ शकतो, असेही ते म्हणाले़ दुपारच्या सत्रात जैवविज्ञान विषयाच्या शास्त्रज्ञा डॉ़ शोभना शर्मा यांनी ‘मलेरिया’ या रोगावर चालू असलेल्या संशोधनाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली़ त्या म्हणाल्या, मलेरिया या रोगावर लस शोधण्याचे काम चालू आहे़ आरटीएसएस ही लस ४० टक्क्यापर्यंत प्रभावी असल्याची त्यांनी सांगितले़
देवकणांच्या शोधासाठी १० हजार शास्त्रज्ञ
By admin | Updated: November 4, 2016 00:01 IST