शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे १०% पाणी जमिनीत

By admin | Updated: May 26, 2016 00:04 IST

औरंगाबाद : औरंगाबादसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भूजल पातळी दरवर्षी दीड ते दोन मीटरने खालावत आहे.

औरंगाबाद : औरंगाबादसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भूजल पातळी दरवर्षी दीड ते दोन मीटरने खालावत आहे. औरंगाबादेत दरवर्षी होणाऱ्या सरासरी ७०० मि. मी. पावसापैकी फक्त १० टक्केच पाणी जमिनीत जाते. चेन्नई शहराप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करण्यात आल्यावरच परिस्थितीत सुधारणा होईल. अन्यथा शहर बकाल होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा भूजलशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांनी दिला.महापालिकेतर्फे बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त अय्युब खान, प्रभारी सहायक संचालक नगररचना वसंत निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना अशोक तेजनकर यांनी सांगितले की, चेन्नई शहराला आंध्र प्रदेशातून पाणी न्यावे लागत होते. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीची केली. अवघ्या काही वर्षांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटला. औरंगाबादेतही असाच कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांच्या विधानाला महापौर त्र्यंबक तुपे यांनी पाठिंबा दर्शविला. जलस्तर ३००-४०० फूट खोल गेला आहे. औरंगाबाद शहरातील ३० टक्के नागरिक या भूजलाचा वापर करतात. हे पाणी बंद झाल्यास महापालिकेला प्रत्येक नागरिकाला पाणी देणे अवघड होऊन जाईल. शहरात १५४ विहिरी मनपाच्या आहेत. त्यातील ९१ विहिरींना चांगले पाणी आहे. ते शुद्ध करून वापरता येऊ शकते. अनेक विहिरींचे पुनर्भरण करावे लागेल. आर्किटेक्ट असोसिएशनचे योगेंद्र बल्लाळ, स्वयंसेवी संस्थेच्या मीनल नाईक, सुकुमार कुलकर्णी, श्रीरंग फरकाडे यांनीही मार्गदर्शन केले. मीनल नाईक यांनी कायमस्वरूपी समिती नेमण्याची सूचना केली. महापौरांनी त्याला सहमती दर्शविली. सूत्रसंचालन वसंत निकम यांनी तर आभार उपायुक्त अय्युब खान यांनी मानले.