शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी येथे १० जणांना खिचडीतून झाली विषबाधा

By admin | Updated: November 13, 2016 00:37 IST

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील एका धार्मिक कार्यक्रमात १० जणांना शनिवारी खिचडीतून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील एका धार्मिक कार्यक्रमात १० जणांना शनिवारी खिचडीतून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला असून, यापैकी ४ जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.आष्टी येथे एका समाजाची पारडगाव आणि बदनापूर येथील संयुक्त जमात गेल्या ३ ते ४ दिवसांपासून येथील प्रार्थनास्थळामध्ये आलेली आहे. धार्मिक शिक्षण देण्याचे कार्य करत होती. मात्र शनिवारी दुपारच्या जेवणात या जमातीने स्वत: खिचडी तयार करुन दुपारचे जेवणात खिचडी खालली. मात्र यातील अनेकांना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उलट्यांचा त्रास सुरु झाल्याने त्यांना आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. यामध्ये शरीफ शब्बीर तांबोळी, शे. सोहेल शे. फारुक, शे. खालेद शे. रशीद, शे. शरीफ शे. बुऱ्हान, स. नासेर स. मुसा सोहेब अहेमद शेख, जावेद असीफ पठाण, हाफेज अन्सार यांना विषबाधा झाली होती. मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी योगेश राठोड हे यावेळी उपस्थित नसल्याने रुग्णांची प्रचंड हेळसांड होत होती. यामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर औषधी निर्माता उबरहंडे यांनी गावातील खाजगी डॉक्टरांना प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावले.यामध्ये डॉ. सावराम गायकवाड, डॉ. जगन्नाथ बरसाले, डॉ. केशव सोळंके यांच्यासह येथील कर्मचाऱ्यांनी विषबाधीत रुग्णांवर उपचार केले. मात्र यापैकी शे. शरीफ तांबोळीसह ४ जणांना त्रास जास्त होत असल्याने त्यांना परतूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, सर्व रूग्णांची प्रकृती आता स्थिर असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्रातून सांगण्यात आले. अचानक झालेल्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.