शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिकल वाहनांसाठी शहरात १० चार्जिंग स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:02 IST

औरंगाबाद : देशभरातील महानगरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहरातही चार्जिंग स्टेशन उभारण्याचे ...

औरंगाबाद : देशभरातील महानगरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहरातही चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात शहरात १० ठिकाणी स्टेशन उभारण्यासंदर्भात टाटा मोटर्स व टाटा पॉवर कंपनीसोबत महापालिकेची चर्चा झाल्याची माहिती प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

इंधनाचे वाढते दर नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दुसरीकडे पेट्रोल व डिझेलच्या वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहन वापरास प्रोत्साहन देत आहे. यासाठी देशात विविध शहरांत इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले जात आहे. देशातील किमान प्रमुख २५ शहरांत इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी केली जात आहे. राजधानी दिल्लीत प्रत्येक तीन किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे. महाराष्ट्रात ठाणे शहरात शुक्रवारी ऑटो रिक्षांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू झाले. या पार्श्‍वभूमीवरच पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार उद्योगमंत्री व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्याची पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातही इलेक्ट्रिकल वाहनांसाठी दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे.

टाटा कंपनीने दिली सहमती

शहरात दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासंदर्भात नुकतीच टाटा मोटर्स व टाटा पॉवर कंपनीसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी हा प्रकल्प औरंगाबाद शहरात राबविण्यास सहमती दर्शवली आहे. यासंदर्भात लवकरच संबंधित कंपनी व पालिका यांच्यात सामंजस्य करार होईल.

आस्तिक कुमार पांडेय, प्रशासक, महापालिका.

दहा ठिकाणी जागेचा शोध सुरू

शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यापासून पहिले तीन महिने शहरवासीयांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहरात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दहा ठिकाणी हे स्टेशन उभारण्यासाठी जागांची निवडही लवकरच केली जाणार आहे.