शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुस नगरपरिषदेसाठी झेडपीत वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:26 IST

३२ हजार लोकसंख्या असलेल्या घुग्घुस शहराला नगर पालिकेचा दर्जा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या काँग्रेस सदस्यांनी विशेष सभा घेण्याची मागणी केली होती.

ठळक मुद्देकाँग्रेस सदस्यांकडून सत्ताधाºयांचा निषेध : दबावतंत्र वापरल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ३२ हजार लोकसंख्या असलेल्या घुग्घुस शहराला नगर पालिकेचा दर्जा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या काँग्रेस सदस्यांनी विशेष सभा घेण्याची मागणी केली होती. या विषयावर शुक्रवारी विशेष सभा बोलाविण्यात आली. मात्र सत्ताधाºयांनी विरोधकांवर दबावतंत्राचा वापर करून नगर परिषदेच्या मागणीला बगल दिल्याचा आरोप काँग्रेस सदस्यांनी केला आहे. याविरूद्ध विरोधकांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर घोषणा देत सत्ताधाºयांचा निषेध नोंदविला. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधाºयांविरूद्ध विरोधकांचा रोष दिसून आला.जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या २० आणि ४ पंचायत समिती सभापतींनी घुग्घुस नगर परिषद स्थापन व्हावी याकरिता ठराव घेऊन शासनास ठराव पाठविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेची विशेष सभा घेण्यासाठी अध्यक्षांना नोटीस दिली होती. घुग्घुस शहराची लोकसंख्या ३२ हजार ६५४ एवढी असून येथे अद्यापही ग्रामपंचायत अस्तीत्वात आहे. चिमूर व नागभीड येथील लोकसंख्या १५ हजार च्या आत असतानाही शासनाने येथे नगर परिषद स्थापन केली. चिमूर, नागभीड, गडचांदूर येथे नगर परिषद स्थापन व्हावी म्हणून जिल्हा परिषदेमधून ठराव पारीत करण्यात आले होते. परंतु, घुग्घुस येथील लोकसंख्या ३२ हजार ६५४ एवढी असतानाही अजूनही जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव शासनाकडून आला नाही, म्हणून काँग्रेसच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन सभेची मागणी केली होती.शुक्रवारची सभा वेळेवर सुरू झाली. मात्र काँग्रेसचे सदस्य उपस्थित नव्हते. तेव्हा सत्ताधाºयांनी सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. परंतु सभागृहात काँग्रेस पक्षाचे सदस्य १ वाजताच्या सुमारास उपस्थित झाले व सभागृहात चर्चा करण्यासाठी मागणी केली. तेव्हा सत्ताधारी सदस्यांनी विरोधकांना बोलू दिले नाही. विद्यामन जि. प. अध्यक्ष घुग्घुस ग्रामपंचायतीचे सरपंच असताना ९.५१ कोटीचा घोळ केला होता. हा घोळ पुढे येईल म्हणून हा नगर परिषदेचा विषय दाबण्याचा अध्यक्षांचा प्रयत्न होता. म्हणूनच काँग्रेस सदस्यांना सभेत बोलू दिले नाही, असा आरोप काँग्रेस सदस्यांनी केला आहे.चिमूर, नागभीड, गडचांदूर व सिंदेवाही येथे जनतेला नगर परिषद , नगरपंचायत स्थापन झाल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषदेकडील गावे नगर परिषदेकडे जाणे यापेक्षा दुर्दैव काय, असे सत्ताधारी सदस्यांचे म्हणणे होते. मात्र जिल्हा परिषदेचा २४ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळती करण्यात आला, तेव्हा कुठे गेले दुर्दैव, असा प्रतिप्रश्न काँग्रेसच्या सदस्यांनी केला आहे. सभेत चर्चा न करता जि. प. सदस्य नागराज गेडाम यांनी सभेत ठराव नामंजुर करण्याचे मत मांडले व भाजपाच्या सदस्यांनी बाके वाजवून त्यांना समर्थन दिले. मात्र काँग्रेसच्या सदस्यांनी त्यास विरोध करून घुग्घुस नगर परिषद झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. जिल्हा परिषदेच्या दारासमोर सर्व काँग्रेस सदस्यांनी निदर्शने केली.यावेळी काँग्रेस गटनेता डॉ. सतिश वारजूकर, डॉ. आसावरी देवतळे, गोदरू पाटील जुमनाके, खोजराम मरस्कोल्हे, ममता डुकरे, गजानन बुटके, गोपाळा दडमल, नैना गेडाम, स्मिता पारधी, प्रमोद चिमुरकर, राजेश कांबळे, रूपा सुरपाम, रमाकांत लोधे, सुनंदा जिवतोडे, वैशाली शेरकी, विना मालेकर, शिचंद्र काळे, कल्पना पेचे, नामदेव करमनकर, मेघा नलगे, पंचायत समिती सभापती अरविंद देशमुख, विद्या चौधरी, कुंदा जेनेकर, श्याम रणदिवे उपस्थित होते.भोजनावर काँग्रेस सदस्यांचा बहिष्कारजि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे घुग्घुस येथील जनतेला मुलभूत सुविधापासून वंचित ठेवत आहेत. घुग्घुस नगर परिषद झाली तर घुग्घुस येथील ९ कोटी ५१ लाखांचा भ्रष्टाचार समोर येण्याची त्यांना भिती आहे. त्यामुळेच ते सर्व निकष पूर्ण करणाºया घुग्घुस शहराला नगरपरिषद स्थापनेपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप करीत काँग्रेस सदस्यांनी विशेष सभेदरम्यान आयोजित भोजनावर बहिष्कार टाकला.नगर परिषद स्थापनेचा निर्णय शासनाच्या अखत्यारित येत असून जिल्हा परिषदेने ठराव मंजूर केला किंवा नाही केला तरी शासन विचाराधीन असलेले निर्णय घेत असतो. डॉ. सतिश वारजूकर यांनी चिमूर, सिंदेवाही, नागभीड नगर परिषद स्थापनेसाठी विरोध केला तरीही शासनाने तेथे नगर परिषद स्थापन केली. घुग्घुस नगर परिषद व्हावी हा हट्ट राजकीय हेतुने प्रेरित असून भाजप विकासकामांना प्राधान्य देत असल्याने विरोधक आरोप करित आहेत.- देवराव भोंगळे, अध्यक्ष,जि.प. चंद्रपूर.