शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळांच्या विद्यार्थ्यांना लवकरच गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:19 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर अंदाजपत्रकात गणवेशाचा निधी अडकला होता. आता गणवेशासाठी लागणारा तीन कोटींचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला. त्यामुळे या निधीतून तातडीने गणवेश खरेदी करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती क्रिष्णा सहारे यांनी दिले.

ठळक मुद्देतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर : गणवेश देण्याचे शिक्षण सभापतीचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर अंदाजपत्रकात गणवेशाचा निधी अडकला होता. आता गणवेशासाठी लागणारा तीन कोटींचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला. त्यामुळे या निधीतून तातडीने गणवेश खरेदी करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती क्रिष्णा सहारे यांनी दिले.जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा सोमवारी सभापती क्रिष्णा सहारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रोषणी खान, जिल्हा परिषद सदस्य नीतू चौधरी, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज अवताडे, गोपाल दडमल, जे. डी. पोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी गणवेशाची चर्चा झाली.जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. जिल्हा परिषद, नगर परिषद, मनपा, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो.गणवेशासाठी लागणारा निधी बघता अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. ते महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आले. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने निधी मिळालाच नाही. याच कालावधीत शाळा सुरू झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशातच शाळेत हजेरी लावावी लागली होती. गणवेशाचा निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांचा पाठपुरावा सुरू होता. दरम्यान निधी मिळाल्याने लवकरच विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहे.सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची मागणीजिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. मात्र काही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश दिल्या जात नाही. एकाच वर्गात असतानाही मित्राला गणवेश मिळत असताना आपल्याला मिळत नसल्याचे दु:ख चिमुकल्या विद्यार्थ्यांना होते. त्यामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना गणवेश देवून दुजाभाव टाळावा, अशी मागणी आता पालकांनी केली आहे.