शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा खर्रा दुकानांवर जिल्हा प्रशासनाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:31 IST

जिल्ह्यात तंबाखू सेवनातून होणाऱ्या दुर्धर आजाराची संख्या मोठ्या प्रमाणात असून चंद्रपूरला या व्यसनातून मुक्त करण्यासाठी धडक कारवाई करा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी दिले आहे.

ठळक मुद्देअप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : अन्न व औषध प्रशासनाने सक्रिय व्हावे

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यात तंबाखू सेवनातून होणाऱ्या दुर्धर आजाराची संख्या मोठ्या प्रमाणात असून चंद्रपूरला या व्यसनातून मुक्त करण्यासाठी धडक कारवाई करा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी दिले आहे.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील समन्वय समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. तंबाखूपासून होणाºया कॅन्सरसारख्या आजाराची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. यामध्ये खऱ्यामध्ये टाकण्यात येणारा सुगंधीत तंबाखूपासून मोठे नुकसान होत आहे.जिल्ह्यामध्ये मौखिक आरोग्य तपासणीमध्ये एकूण लोकसंख्येच्या शेकडो नागरिकांना तंबाखू सेवनातून मौखिक आजार असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यामध्ये खर्रा सेवनामुळे मोठ्या प्रमाणात कॅन्सर आजारात वाढ होत असल्याचेही पुढे आले असून जवळपास ३६ टक्के लोकांना तंबाखूचे व्यसन जडले आहे, अशी माहिती बैठकीत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. नगराळे यांनी दिली. बंदी घालण्यात आलेल्या सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला आहे. पोलीस प्रशासनाच्या मदतीने या विभागाने धडक कारवाई करावी, शहरातील मोक्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्रा व प्रतिबंधित तंबाखू विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात कडक कारवाई करावी, असे कडक निर्देश अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाला देण्यात आले. जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी येत्या काळात व्यापक प्रसिध्दी-प्रचार मोहीम राबविण्यात यावी. तसेच अवैधरित्या घातक खर्रा तयार करणाºया पानटपरीधारकांवर कारवाईची तिव्रता वाढवावी, असेही ते म्हणाले.भरारी पथक गठित करण्याच्या कडक सूचनाशाळांच्या परिसरातील दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी असून कायद्यांर्तंगत कारवाईचे अधिकार पोलीस व अन्न व औषध प्रशासनाला आहे. संबंधीत मुख्याध्यापकांनी याबाबत अन्न व औषधी विभागाकडे तक्रारी कराव्यात. यासाठी भरारी पथक तयार करण्याचे निर्देशही बैठकीत दिले.