शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईवर जिल्हा परिषदेचे हात वर

By admin | Updated: April 28, 2017 00:50 IST

जिल्ह्यात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नागरिकांची पाण्यासाठी होरपळ सुरू असून लांबवर जाऊन पाणी आणावे लागत आहे.

सत्ताधारी ढिम्म : परिस्थितीवर मात करण्यासाठी सभाच नाही चंद्रपूर : जिल्ह्यात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नागरिकांची पाण्यासाठी होरपळ सुरू असून लांबवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषदेने वेळीच उपायोजना करण्याची गरज होती. मात्र एवढी गंभीर समस्या असतानाही सत्ताधाऱ्यांनी कोणतीही उपायोजना न करता, जिल्हा परिषदेची पाणी टंचाईवर एकही सभा घेतलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी केवळ विकासाचा कांगावा करीत असून जिल्हा परिषद ढिम्म असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे काँग्रेस गटनेते सतीश वारजूकर यांनी केला आहे. पाणी टंचाईवर आढावा बैठक घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा म्हणून गटनेता डॉ. सतिश वारजुकर यांनी काँग्रेसचे २१ सदस्य व ४ सभापती यांच्या स्वाक्षरीनिशी जि.प. अध्यक्षांना नोटीस दिली होती. या अगोदरही मागील वर्षीचा आढावा घेण्यासाठी ५ एप्रिलला नोटीस दिली होती. ती सभा २ मे रोजी म्हणजे तब्बल २७ दिवसांनी लावली. पण पाणी पुरवठा योजनेवरील पहिला हप्ता मिळाला की दुसऱ्या हप्त्यासाठी सहा-सहा महिने वाट पहावी लागते. त्यावर काहीही उपाय योजना करीत नाही. जिल्हा परिषदेत फाईली सहा-सहा महिने फिरत असतात. जो सतत पाठपुरावा करीत असतो व पैसे देत असतो अशांचीच फाईल बाहेर काढली जाते, असा आरोप वारजूकर यांनी केला आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे जनावरे मृत्यूमुखी पडत आहे. जिकडे-तिकडे आगीच्या घटना घडत आहेत. पाण्याची सोय नाही. त्यामुळे आगी आटोक्यात येत नाही व घरे जळून खाक होत आहेत. जिल्ह्यात सर्वत्र पाण्यासाठी हाहाकार सुरु आहे. परंतु जि.प.तील पदाधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत. अनेक गावात हातपंप बंद पडले आहेत. तर कुठे कंत्राटदाराच्या तर कुठे अधिकाऱ्यांच्या तर कुठे पदाधिकाऱ्यांच्या हेकेकोरपणामुळे पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. अनेक ठिकाणी फ्लोराईड युक्त पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परंतु लोकांचा नाईलाज असल्यामुळे असेही पाणी प्यावे लागत आहे. मागील वर्षी सुद्धा हीच परिस्थिती होती. परंतु यावर सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही. दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. लोकांचा जिवन मरणाचा प्रश्न असतानाही जिल्हा परिषदेचे पदाधिकारी लक्ष देत नसल्याने नागरिकांनी काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी) हातपंप आणि पाणी पुरवठा योजनाही बंद काही काही गावे अशी आहेत की, त्या गावांमध्ये मोजकेच हातपंप आहेत, परंतु तेही बंद आहेत. ते दुरुस्ती करण्यासाठी दुरुस्तीची अपुरी वाहने असल्यामुळे हातपंप दुरुस्ती होवू शकत नाही. अशा गावातील लोकांना पाण्यासाठी फारच त्रास सहन करावा लागत आहे. काही गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे अर्धवट काम झाले आहे. योजनेचे काम कसे झाले, योग्य झाले की काय, यावर कोणाचेही लक्ष नाही. केवळ कमिशनच्या हव्यासापोटी कामाची पाहणी न करता देयके दिल्या जात आहेत, असा प्रकार सुरू असल्याचे म्हटले आहे.