शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारीच्या खांद्यावर जिल्हा परिषदेचा डोलारा

By admin | Updated: May 14, 2016 00:37 IST

येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची २९ एप्रिल रोजी ठाणे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली.

नवीन सीईओची प्रतीक्षा : तीन पदांचा भार एकाच अधिकाऱ्यावरचंद्रपूर : येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची २९ एप्रिल रोजी ठाणे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. तेव्हापासून चंद्रपूर जिल्हा परिषदेचा कारभार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सुरू आहे. यामुळे विविध कामांमध्येही अडथळे येत असून नवीन सीईओची प्रतीक्षा लागली आहे. बदली झालेले महेंद्र कल्याणकर हे गतवर्षीच जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या अनेक बैठका रात्री उशीरापर्यंत चालायच्या. याबाबत विरोधक व सत्ताधाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. कर्मचाऱ्यांत त्यांचा चांगला दरारा होता. मात्र जेमतेम एक वर्षातच त्यांना पदोन्नती देत ठाणे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. बदलीनंतर दोन-तीन दिवसांत ते चंद्रपुरातून भारमुक्त झाले. त्यांची बदली होऊन आता १५ दिवस झाले आहेत. मात्र नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्याकडे आहे. या व्यतीरिक्त अशोक सिरसे यांच्याकडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचाही भार आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याला तीन पदांचा भार सोसावा लागत असून अनेक कामांवर परिणाम होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या विरोधी सदस्यांचे म्हणणे आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेत सध्या भाजप पक्षाची सत्ता आहे आणि राज्यातही भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे वित्त व वन मंत्री आहेत. तरीही नवीन सीईओंच्या नियुक्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाला प्रतीक्षा करावी लागत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे. तर आपल्या मर्जीतील मुख्य कार्यकारी अधिकारी असावा, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची फिल्डींग आहे. त्यामुळे नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला विलंब केला जात असल्याचा आरोप विरोधी सदस्यांचा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)