शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ६०० शाळा होणार डिजीटल

By admin | Updated: July 27, 2016 01:11 IST

वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेअंतर्गत

सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार : विद्यार्थ्यांना मिळणार ई-लर्निंगचे धडे चंद्रपूर : वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शाळांना डिजीटल करण्याच्या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६०० प्राथमिक शाळांना डिजीटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मानव विकास आयुक्तालय औरंगाबाद यांनी २५ जुलै रोजी याबाबत आदेश निर्गमित केला आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना डिजीटल शाळा करण्याचा मनोदय जाहीर केला होता. त्याअनुषंगाने त्यांनी मानव विकास आयुक्तालयाच्या स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश आले. जिल्हा परिषदेच्या ६०० प्राथमिक शाळांना डिजीटल करण्यासाठी ४४७.२५ लक्ष च्या योजनेला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ई-लर्निंगची सोय उपलब्ध होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उंचावण्याच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी) प्रती शाळा ७४ हजार रूपयाचा खर्च अपेक्षित डिजीटल शाळा करण्यामध्ये मुल, पोंभुर्णा, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, राजुरा, वरोरा, जिवती तालुक्यातील प्रत्येकी ५७ शाळा, सावली ५१, व गोंडपिपरी तालुक्यातील ४७ अशा ६०० शाळांचा समावेश आहे. प्रती शाळा डिजीटल करण्यासाठी संगणक संच २६ हजार ४४ रूपये, प्रोजेक्टर ३१ हजार १६८ रूपये, स्पीकर अडीच हजार रूपये, प्रिंटर्स ४ हजार ९२८ रूपये, सॉफ्टवेअर ९ हजार ९०० रूपये असा अंदाजित खर्च येणार असून प्रती शाळा सरासरी ७४ हजार ५४२ रूपये खर्च अपेक्षित आहे.