शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदलीप्रकरणे वादळी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

सामान्य प्रशासन विभागाच्या १ जुलैच्या शासन निर्णयानुसार १४ आगस्टपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश जारी केले होते. याच आदेशाला अनुसरून १४ जुलै २०२१ रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदला पत्र पाठवून कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. चंद्रपूर जि. प. अंतर्गत सर्वच विभागाच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होईल.

ठळक मुद्देआजपासून समुपदेशन : बदलीनंतरही बीईओंना केले नाही भारमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाकडून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश धडकल्यानंतर रविवारपासून समुपदेशनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, गतवर्षी शिक्षण विभागातील बीईओची बदली होऊनही शिक्षणाधिकाºयांनी भारमुक्त केले नाही. हे अधिकारी पूर्वीच ठिकाणी कार्यरत असून त्यांची सेवाज्येष्ठता चक्क शुन्य दाखविण्यात आली. परिणामी, कर्मचाऱ्यांची बदलीप्रकरणे समुपदेशाऐवजी वादळी ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सामान्य प्रशासन विभागाच्या १ जुलैच्या शासन निर्णयानुसार १४ आगस्टपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश जारी केले होते. याच आदेशाला अनुसरून १४ जुलै २०२१ रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदला पत्र पाठवून कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. चंद्रपूर जि. प. अंतर्गत सर्वच विभागाच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होईल. गतवर्षी बदली झालेल्या शिक्षण विस्तार एक वर्षे पूर्ण होऊनही शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी भारमुक्त केले नाही. हे अधिकारी पूर्वीच्याच ठिकाणी कार्यरत आहेत. जि. प. ने २१ जुलै २०२१ रोजी बदली पात्र शिक्षण विस्तार अधिकारी व अन्य पदांची यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये चार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता शुन्य दाखविण्यात आली. गतवर्षी बदली झाल्यानंतरही या अधिकाऱ्यांना भारमुक्त केले नाही. परिणामी, ते ज्या ठिकाणी कार्यरत आहेत तिथे नवीन बदलीपात्र शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना संधी दिले जात असेल तर या बदल्यांना काय अर्थ, असा प्रश्न  शिक्षण  विभागातील अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

बदलीपात्र कर्मचाऱ्यांची उसळणार गर्दीजि. प. च्या सर्वच विभागातील वर्ग-३ कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया रविवारपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया दुपारी ४. ४५ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत चालेल. नक्षलग्रस्त भागातील कर्मचारी व बिगर नक्षलग्रस्त क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत तसेच सुट घेणारे सर्वच कर्मचारी आवश्यक प्रमाणपत्रांसह दाखल होणार आहेत. त्यामुळे गर्दी उसळणार आहे.

२० टक्के बदल्यांना मान्यता- सामान्य प्रशासन व ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार २० टक्के बदल्यांना मान्यता मिळाली आहे. यापूर्वी दोन आदेश धडकल्याने त्यामुळे नेमक्या किती टक्के बदल्या होणार, याबाबत कर्मचारी व संघटनांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. नव्या आदेशामुळे हा संभ्रम दूर झाला आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली