शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

जिल्हा परिषद शाळा टाकताहेत कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:45 IST

संगणकीय युगात इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रकाशझोतात येत असताना जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र कोरपना तालुका अपवाद ठरत आहे. या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी खासगी शाळांबरोबर स्पर्धेत उतरून.....

ठळक मुद्दे११ शाळांना आयएसओ मानांकन : विविध उपक्रमात नागरिकांचाही सहभाग

सतीश जमदाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआवाळपूर : संगणकीय युगात इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रकाशझोतात येत असताना जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र कोरपना तालुका अपवाद ठरत आहे. या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी खासगी शाळांबरोबर स्पर्धेत उतरून तेथील शिक्षक हे माझी शाळा प्रगती कशी साधणार, याकडे जातीने लक्ष देत आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी सुरक्षा, आंतर-बाह्य स्वच्छता, शालेय शिस्त, व्यवस्थापन सुलभता, शिक्षक जबाबदारी अशा किचकट निकषांची पुर्तता करून आतापर्यंत ११ जि. प. शाळा आयएसओ मानांकित ठरल्या आहेत.आयएसओ मानांकित असलेली पिंपळगाव ही शाळा शाळा सिद्धी उपक्रमात राज्यात ७४ व्या स्थानी आहे. या शाळेत शालेय परिपाठाबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ११ ही शाळांमधील शिक्षक शैक्षणिक कामे पूर्ण करून आपली शाळा कशी सरस ठरेल, यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवून अधिकचे वर्ग घेतले जात आहे. याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. या शाळांच्या भरारीत गावातील नागरिकांचाही मोलाचा वाटा आहे. विविध उपक्रमात गावकरी हिरहिरीने सहभाग दर्शवून शाळेला वाटेल ती मदत करतात. श्रम असो की, आर्थिक बाजू नागरिक सहकार्य करीत असल्याने तालुक्यातील शाळा प्रगतिपथावर आहेत. आतापर्यंत ११ शाळांना आयएसओ नामांकन मिळाले असून काही शाळा नामांकनाच्या उंबरठ्यावर आहेत.मुले बोलतात इंग्रजीजिल्हा परिषद शाळेत मुलाला दर्जेदार शिक्षण मिळत नाही, त्याला इंग्रजी वाचता येत नाही, असा अनेक नागरिकांचा भ्रम आहे. मात्र त्याला अपवाद ठरवत पिंपळगाव येथील विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील शाळांच्या मुलांना लाजवेल, अशी इंग्रजी बोलतात. त्यांचे चांगल्या प्रकारे लिखाण, वाचन आहे. या शाळेत उन्हाळ्यातसुद्धा इंग्रजी विषयाचे अधिकचे वर्ग घेतले जातात.या शाळा आयएसओ मानांकनकोरपना तालुक्यातील हिरापूर, थुटरा, लखमापूर, गोपालपूर, पिंपळगाव, आवाळपूर, बिची, गेडामगुडा, आसन (बु.), भोयगाव, कोल्हापूर गुडा अशा ११ शाळा आतापर्यंत आयएसओ मानांकित ठरल्या आहेत.नियोजन व त्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करणे म्हणजे आयएसओचे ब्रीद आहे. यातून नक्कीच विद्यार्थी विकासासाठी वाव मिळत असून काही तरी नाविन्यपूर्ण केल्याचे समाधान मिळते.- सुधाकर मडावीमुख्याध्यापक, जि. प. शाळा हिरापूर.लोकसहभागातून शिक्षकांनी शाळेत पूर्ण भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. खाजगी शाळेच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळा मागे राहू नये, शैक्षणिक दर्जा सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक मेहनत घेत आहेत. यात शिक्षकांत चुरस निर्माण झाली आहे.- विलास देवाडकरकेंद्रप्रमुख, कोरपना.