शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

जिल्हा परिषदेने व्याज घेऊनही दिली नाही शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:00 IST

मोठा गाजावाजा करून आर्थिकदृष्टया दुर्बल समाज घटकांतील विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले दत्तक योजनेअंतर्गत आर्थिक आधार देण्यासाठी जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या वेतनातून २३ लाख ५० हजार रूपये जमा केले होते. या रक्कमेवर तब्बल १२ लाख ५० हजार रूपये व्याजही मिळाले.

ठळक मुद्देसावित्रीबाई दत्तक योजना : २३ लाख ५० हजार रुपये अद्याप वितरणाविना

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मोठा गाजावाजा करून आर्थिकदृष्टया दुर्बल समाज घटकांतील विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले दत्तक योजनेअंतर्गत आर्थिक आधार देण्यासाठी जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या वेतनातून २३ लाख ५० हजार रूपये जमा केले होते. या रक्कमेवर तब्बल १२ लाख ५० हजार रूपये व्याजही मिळाले. मात्र, २०१४ पासून या योजनेचे रक्कम अद्याप वितरण केले नाही. त्यामुळे विद्यार्थिनींनी आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई दत्तक पालक योजना लागू करण्यात आली. याकरिता शिक्षकांच्या वेतनातील विशिष्ट रक्कम जमा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. यानुसार जिल्ह्यातील शिक्षकांचे २३ लाख ५० हजार रूपये जिल्हा परिषदेमध्ये जमा झाले. या रक्कमेतून पात्र विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देणे बंधनकारक होते. परंतु, ढिसाळ नियोजन आणि उदासिन धोरणांमुळे ही रक्कम हजारो विद्यार्थिनींना मिळाली नाही. शिक्षकांनी जमा केलेल्या रकमेवर जिल्हा परिषदेला १२ लाख ५० हजारांचे व्याज मिळाले. ही रक्कम आता ३६ लाखांपर्यंत झाली आहे.शिक्षण समितीच्या सभेत अधिकाऱ्यांविरूद्ध रोषया योजनेचा निधी विद्यार्थिनींना न मिळाल्याने जि. प. शिक्षण समितीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरूद्ध रोष व्यक्त केला. शिक्षण समिती सभापती तथा उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी या योजनेवरून संबंधितांना धाबेवर धरले. शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच निधी वितरण करण्याचे निर्देशही दिले. सदस्य पृथ्वीराज अवथडे, रोशनी अनवर खान, नितु चौधरी, गोपाल दडमल, रंजित सोयाम, कल्पना पेचे, तज्ज्ञ सदस्य जे. डी. पोटे आदींनीही विद्यार्थिनींच्या आर्थिक कोंडीकडे लक्ष वेधून रक्कम तातडीने अदा करण्याची सूचना बैठकीत मांडली.दत्तक योजनेच्या निकषात बदल‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल’ हा निकष लक्षात घेऊन सावित्रीबाई दत्तक पालक योजनेचा विद्यार्थिनींना लाभ देण्याचा निर्णय यापूर्वी जिल्हा परिषदेने घेतला होता. यामध्ये आता बदल करण्यात आले. नव्या निकषानुसार आई- वडील नसणे, आई अथवा वडील नसणे, आई वडील दिव्यांग असणे तसेच आई वडील हयात असताना त्यांचा कुणीच सांभाळ न करणे अशा उपेक्षित विद्यार्थिनींनाही मुख्याध्यापकांच्या प्रमाणपत्राच्या आधारावर या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.बैठकीला दांडी मारल्यास वेतन कपातदरमहा होणाऱ्या शिक्षण समितीच्या बैठकीत संबंधित गट शिक्षणाधिकारी परवानगी न घेता गैरहजर राहतात किंवा प्रतिनिधी पाठवून जबाबदारी झटकतात. शिक्षण विभागातील प्रलंबित समस्यांबाबत तोडगाच निघत नाही. त्यामुळे बैठकीला स्वत: हजर न होणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे एक दिवसांचे वेतन कापण्याचा ठराव शिक्षण समितीने पारीत केला आहे.सेमी इंग्लिशसाठी ४७ शाळांचे प्रस्तावजिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्यासाठी आता ४७ शाळांनी प्रस्ताव सादर केले. शिक्षण समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. जिल्ह्यातील आणखी काही प्राथमिक शाळा प्रस्ताव सादर करणार आहेत.