शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनो राष्ट्राप्रती समर्पित भावना ठेवून कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2017 00:57 IST

श्रमसंस्कार शिबिरातून समाजाला दिशा देण्याचे कार्य होत असते.

संभाजी वरकड यांचे प्रतिपादन : गोवरी येथे श्रमसंस्कार शिबिरराजुरा : श्रमसंस्कार शिबिरातून समाजाला दिशा देण्याचे कार्य होत असते. आपल्या असामान्य कर्तुत्वाने महान झालेल्या महापुरुषांचे विचार तरुणांनी आत्मसात केले पाहिजे. श्रमसंस्कार शिबिरातून समाजात चिरंतन टिकणारी मुल्य रूजली पाहिजे. यासाठी तरुणांनी सकारात्मक दृष्टीकोण ठेवणे गरजेचे आहे. देश घडविण्यासाठी तरुणांनी समर्पित भावनेतून कार्य करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.संभाजी वारकड यांनी केले.शिवाजी महाविद्यालय राजूराच्या वतीने गोवरी येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनील उरकुडे तर प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष अविनाश जाधव, हरिचंद्र जुनघरी, गोपीनाथ जमदाळे, नागोबा लांडे, दिवाकर झाडे, संचालक प्राचार्य दौलतराव भोंगळे, मुख्याध्यापक देवराव निब्रड, रामदास बोथले, ग्रामविकास अधिकारी सचिन विरुटकर, कार्यक्रम अधिकारी विशाल दुधे आदी पाहुणे मंचावर उपस्थित होते. सतत पाच दिवस चाललेल्या श्रमसंस्कार शिबिरात विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व इत्यादी विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी सरपंच सुनील उरकुडे यांनी घराघरात स्वच्छतेचा मुलमंत्र रुजविण्यासाठी नागरिकांची मने स्वच्छ करण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावे. तसेच सुदृढ व निरोगी समाज रचनेचा पाया प्रत्येकांच्या मनात रूजला पाहिजे यासाठी युवकांनी कार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक विशाल दुधे यांनी केले. संचालन संजय लाटेलवार यांनी तर उपस्थिताचे आभार प्रा. राजेंद्र मुद्मवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)