शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वेळेवर उपचार न मिळाल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:22 IST

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर असलेल्या युवकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देडॉक्टर गायब : नातेवाईकांचे रुग्णालयात धरणे

आॅनलाईन लोकमतभिसी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर असलेल्या युवकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी प्राथमिक उपचार न करताच त्याला नागपूर येथे रेफर केले. त्यामुळे त्या युवकाचा वाटेतच मृत्यू झाला. त्यामुळे युवकाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी करीत धरणे दिले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.दिगंबर मेश्राम यांनी दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.भिसी येथील आकाश राजकुमार पाटील (२७) याला त्यांच्या कुटुंबियांनी ३ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र यावेळी रुग्णालयात एकही आरोग्य अधिकारी हजर नव्हता, यावेळी डॉ. गेडाम यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी आपण सुटीवर असल्याचे सांगत फोन कट केला. नुकत्याच रुजू झालेल्या महिला वैद्यकीय अधिकारी जैन यासुद्धा केंद्रावर नव्हत्या. एक तासानंतर तिथे परिचारिका पोहोचली. यानंतर रुग्णाला आॅक्सिजन सिलिंडर लावण्यात आले. मात्र हे सिलिंडरच पूर्णपणे रिकामे होते. अखेर या रुग्णाला नागपूर येथे हलविण्याचे सांगून परिचारिकेने देखील हात वर केले. यानंतर खासगी रुग्णवाहिका बोलावून रुग्णाला नागपूर येथे पाठविण्यात आले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे युवकांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी केली.दोषींवर कारवाई करण्याची मागणीवेळेवर उपचार न झाल्याने आकाशचा मृत्यू झाला, असा आरोप करीत त्यांच्या नातेवाईकांनी, जोपर्यंत दोषी डॉक्टरांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत प्रेत उचलणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे रुग्णालयात बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर मेश्राम यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देत त्यासंबधित अहवाल वरिष्ठांना पाठविल्याची माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यास पाठविले.