शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांना व्यवसाय शिक्षणाची नितांत गरज

By admin | Updated: April 30, 2017 00:36 IST

देशातील तरुणांना व्यवसाय शिक्षण दिल्याशिवाय तरणोपाय नाही. मागील दोन दशकांत व्यवसाय शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण चीनच्या मागे पडलो आहोत.

रणजित पाटील : एमसीव्हीसी शिक्षकांचे अधिवेशनगडचांदूर : देशातील तरुणांना व्यवसाय शिक्षण दिल्याशिवाय तरणोपाय नाही. मागील दोन दशकांत व्यवसाय शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण चीनच्या मागे पडलो आहोत. त्यामुळे आय.टी.आय. व एम.सी.व्ही.सी. अभ्यासक्रमाला भविष्यात महत्त्व येणार असून त्यादृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री तथा कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.शेगाव येथे संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात एम. सी. व्ही. सी. शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन ना. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र व्होकेशनल कोर्स टिचर्स असोसिएशनच्या वतीने प्रथमच आयोजित राज्यस्तरीय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष डॉ. युगल रायलू होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. आकाश फुंडकर, अमरावती विभागाचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक पी. टी. देवतळे, संघटनेचे महासचिव प्रा. संदीप रेवतकर, उपाध्यक्ष प्रा. शंंकर केळझरकर, प्रा. जयंत भांबे, प्रा. भालचंद्र येडमे आदी उपस्थित होते.याप्रसंगी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. आकाश फुंडकर, सहसंचालक पी.टी. देशमुख, गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य सोमानी, संस्थानचे अध्यक्ष पाटील यांचा संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.अधिवेशाच्या दुसऱ्या सत्रात एम. सी. व्ही. सी. मधून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा तसेच नवनिर्वाचित महानगरपालिकावर सदस्याचा सत्कार करम्यात आला.महाराष्ट्रातील एम. सी. व्ही. सी. अभ्यासक्रमातील शिक्षकांना सुधारित वेतन श्रेणी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रा. शालिक फाले यांच्या प्रयत्नाने व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या परिश्रमातून मिळाल्याचे जिल्हा सचिव प्रा. राजूरकर यांनी सांगितले. संचालन प्रा. कुळकर्णी यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रकाश तराळे, प्रा. महेंद्र कंकाळे, प्रा. अनिल देशमुख, राजेश सावरकर, जगन्नाथ बरडे, विजय कोल्हे, प्रियश्री नागपुरे, सुनील आखरे, सुरेंद्र वानखेडे, विजय वाकडे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)