शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

युवा शेतकऱ्याची कर्जापायी आत्महत्या

By admin | Updated: March 2, 2017 00:35 IST

येथील युवा शेतकरी नितीन देवराव घाटे (३० वर्षे) याने २८ फेब्रुवारीच्या रात्री आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

नंदोरी : येथील युवा शेतकरी नितीन देवराव घाटे (३० वर्षे) याने २८ फेब्रुवारीच्या रात्री आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्यावर असलेले बँकेचे आणि खाजगी कर्ज हे आत्महत्येमागील कारण सांगितले जात आहे.नितीन घाटे याच्या नावाने चार एकर शेती असून त्याच्यावर बॅँक आॅफ इंडिया नागरी शाखेचे ६५ हजार रूपयांचे कर्ज होते. या सोबतच दोन लाख रूपयांचे खाजगी कर्जही त्याच्यावर होते. या कर्जासाठी त्याने आपली शेती तारण ठेवली होती. काही दिवसांपूर्वी शेतीसाठी त्याने टॅ्रक्टर खरेदी केले होते. मात्र त्या कर्जाचे हप्ते न भरू शकल्याने टॅ्रक्टरची जप्ती झाली होती. हे कर्ज त्याच्यावर थकित होते. यामुळे तो नेहमी विवंचनेत असायचा. २८ फेब्रुवारीच्या रात्री शांतता झाल्यावर त्याने आपल्या राहत्या घराच्या मोकळ्या जागेत जावून नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. रात्री दोन वाजताच्या सुमारास त्याच्या वडीलांना जाग आल्यावर तो बिछान्यावर दिसला नाही. त्यामुळे शोधाशोध सुरू केल्यावर काही वेळानंतर हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. सकाळी वरोरा पोलिसांनी घटनास्थळी येवून प्रेत ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठविले. दुपारी त्याच्या पार्थिवावर नंदोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे वडील, एक बहिण, पत्नी असा आप्तपरिवार आहे. (वार्ताहर)वाढदिवसाच्या दिवशीचकेली आत्महत्या२८ फेब्रुवारी या दिवशी नितीनचा वाढदिवस होता. मात्र परिस्थितीमुळे त्याला आपला वाढदिवस साजरा करता आला नाही. नेमका हाच दिवस त्याने आपली जीवनयात्रा संपविण्यासाठी निवडला. हा योगायोग की नियतीचा खेळ असा प्रश्न या घटनेने पडला आहे.