शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी पीडितांनी व्यक्त केल्या आपल्या व्यथा

By admin | Updated: August 5, 2014 23:43 IST

भारतीय परिवार बचाव संघटना (सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन) तर्फे पत्नी पिडीतांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष

चंद्रपूर : भारतीय परिवार बचाव संघटना (सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन) तर्फे पत्नी पिडीतांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, प्रमुख पाहुणे सहकार शिक्षणाधिकारी नरेंद्र पिंपळकर, संस्थेचे कायदे विषयक सल्लागार अ‍ॅड. संदीप नागपुरे, डॉ. राहुल विधाते, शीतल साळवे आदी उपस्थित होते. पत्नी पीडितांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी विचाराचे आदानप्रदान झाले. कायदेविषयक मार्गदर्शन अ‍ॅड. संदीप नागपुरे यांनी केले. चंद्रपूर येथे कौटुंबिक न्यायालय फास्ट ट्रॅक कोर्टच्या धर्तीवर व्हावे जेणेकरुन आरोपी फिर्यादीचा वेळ व पैशाची बचत होऊन न्याय त्वरित मिळेल, अशी आशा डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी व्यक्त केली.महिलांच्या हाती ४९८(अ) चा कायदा आहे. मर्जीप्रमाणे पती नाचला तर, ठिक नाहीतर ४९८ (अ) चा कायद्यानुसार सासरचे सर्वकुटुंब गजाआड करता येते. घरात पत्नी आहे की, दहशतवादी आहे. हेच कळत नसल्याच्या भावना काहींनी यावेळी व्यक्त केल्या. या कायद्याच्या गैरवापरामुळे संंपूर्ण कुटुंब दहशतीत वावरते, नातेवाईक व समाज विरोधात असते. महिला तक्रार मंचात खटला दाखल करताना पती दारु पितो, मारहाण करतो, शारीरिक व लैंगिक त्रास देतो, खर्चाला पैसे देत नाही, घरी उशीरा येतो, परस्त्रीशी संबंध आहे. अशी तक्रार करते. परंतु येथे समझौता न झाल्यास तीच स्त्री माहेरची मंडळी, संधिसाधू सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पती मला हुंड्यासाठी त्रास देतो असे खोटे सांगतात. हुंडाबळीची केस करते. आणि पूर्ण परिवाराला हुंडाबळीच्या नरकयातना भोगाव्या लागतात. यात घरातील वृद्ध, महिला, लहान मुल, गर्भवती स्त्रीया अडकल्या जाते.पत्नी पतीला आपल्या मर्जीत ठेवतात. पतीचा एटीएमसारखा वापर करीत आहे. सासू व सासऱ्याला हमाल बनविले आहे. या प्रकरणात माहेरील लोकांचा हात असतो, ज्या घरात माहेरील लोकांची ढवळाढवळ जास्त असते ते घर उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नसल्याचाही सूर यावेळी काहींनी व्यक्त केला. मोबाईलची महत्त्वाची भूमिका असते. लग्नाला सौद्याचे रुप येत आहे. आज लग्न व चार दिवसांनी पैशाची मागणी करुन घटस्फोट, विवाह पैसा कमविण्याचे साधन होत आहे. समाजाला कीड पोखरुण काढीत आहे. भविष्यात कौटुंबिक समस्या वाढण्याची शक्यताही यावेळी काहींनी व्यक्त केली.पोलीस प्रशासनाने कौटुंबिक प्रकरणात आतताईपणा करुन कारवाई करु नये. सामाजिक जाण ठेवावी, आईवडिलांची आपले पणाची भावना वाढीस लागावी, कुटुंबाची संकल्पना टीकून राहावी, पाल्यांना संपूर्ण घराचा अनुभव जगता यावा, कौटुंबिक कलहाचे निकाल लवलकर लागावे या उद्देशाने कौटुंबिक न्यायालयाची गरज असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले. सभेला संदीप आत्राम, शंकर लोनगाडगे, किशोर ताजणे, आशिक शेख व इतर संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)