शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

त्या तरुणाची दोनदा निघाली अंत्ययात्रा.. नेमके काय कारण होते..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 11:37 IST

Chandrapur News घरापासून सुमारे शंभर मीटरवर अंत्ययात्रा जात नाही तोच पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी तिथेच अंत्ययात्रा थांबविली. चंद्रपूरलगतच्या दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना.

ठळक मुद्देदुसऱ्या अंत्ययात्रेनंतर त्या युवकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एका २२ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूची वार्ता कळताच नातेवाईक गोळा झाले. घरातून स्मशानभूमीच्या दिशेने अंत्ययात्रा निघाली. घरापासून सुमारे शंभर मीटरवर अंत्ययात्रा जात नाही तोच पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी तिथेच अंत्ययात्रा थांबविली. मृत्यूबाबत काही नागरिकांनी संशय व्यक्त केल्यामुळे शवविच्छेदन करायचे असल्याचे सांगून मृतदेह शववाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात नेला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. यानंतर पुन्हा अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना चंद्रपूरलगतच्या दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमित्र नगर तुकूममध्ये गुरुवारी घडली. पियुष गोहणे (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना चर्चेचा विषय ठरली होती.प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूरलगतच्या दुगार्पूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमित्रनगर तुकूम येथे गोहणे कुटुंब भाड्याने राहते. आई आणि दोन मुले असे त्यांचे कुटुंब आहे. यापैकी लहान मुलगा पियुष गोहणे याचा मृतदेह गुरुवारी सकाळी गळफास घेऊन असलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत कुटुंबीय व नातेवाईकांकडून पोलीस ठाण्यात कोणतीही सूचना देण्यात आली नाही. पोलिसांपासून ही माहिती दडविल्याने पियुषचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला वा त्यामागे काही वेगळे कारण आहे, अशा शंका-कुशंकाना पेव फुटले होते. गुरुवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास पियुषच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याकरिता घरून स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा निघाली. जेमतेम शंभर मीटर अंतर गाठले असताना अचानक पोलिसांनी येथील एसआर पेट्रोल पंपाजवळ ही अंत्ययात्रा अडविली. चौकशीअंती मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन विच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला. मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्ययात्रा अडविण्यासाठी पोलिसांसोबत होती एक तरुणी?पियुषची अंत्ययात्रा अडविण्यासाठी पोलीस आले तेव्हा त्यांच्यासोबत काही तरुण आणि एक तरुणी होती, अशी चर्चा आहे. या मंडळींनीच पोलिसांकडे पियुषच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. पोलिसांसोबत असलेले तरुण हे पियुषचे मित्र असल्याचे समजते. मात्र, ती तरुणी पियुषची प्रेयसी तर नव्हती ना? अशी चर्चा या घटनेनंतर ऐकायला येत आहे. प्रेयसी असेल तर पियुषने प्रेमप्रकरणातून आत्महत्या तर केली नाही ना, असा संशयही व्यक्त केला जात आहे.पोलिसांकडून अतिशय गोपनीयतापियुषने आत्महत्या केल्याची तक्रार कोणी दिली. याबाबत ठाणेदार स्वप्नील धुळे यांना विचारले असता त्यांनी ते नाव गोपनीय ठेवले. काही नागरिकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्याने अंत्ययात्रा रस्त्यात थांबवून कुटुंब व नातेवाईकांना समजावून मृतदेह ताब्यात घेतल्याचे ठाणेदार धुळे यांनी सांगितले. काही बाबी तपासात निष्पन्न होतील, असेही ते म्हणाले.कोटगळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती. त्यावरून वाटेतच अंत्ययात्रा थांबवून चौकशीअंती मृतदेह विच्छेदनाकरिता पाठविण्यात आला. विच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन केला. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली नाही ना, हे चौकशीअंती कळेल.-स्वप्नील धुळे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे दुर्गापूर

टॅग्स :Deathमृत्यू