केंद्र सरकारने खाद्य तेल, पेट्रोल, डिझेल, सिलिंडर व जीवनावश्यक वस्तूंच्या दराने महागाईचे विक्रम मोडीत काढले. ही दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी असून जनतेची आर्थिक लूट करणारी आहे. अन्नधान्य, भाजीपाला, खाद्य तेल, फळभाज्या इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत दिवसागणिक भरमसाट वाढ होत आहे. घरगुती सिलिंडर ९०० रुपयांच्या जवळ पोहचला. कोरोना महामारीमुळे गरिबांच्या रोजगारावर गदा आणल्याचा आरोपही यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीने केला. महिलांनी जैन भवन ते गांधी चौक असा मोर्चा काढून नारेबाजी केली. आंदोलनात शहर संघटिका वंदना हातगावकर, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, कल्पना शिंदे, रूपा परसराम, कविता शुक्ला, अनिता झाडे, शमा काझी, अल्का मेश्राम, दुर्गा वैरागडे, कौसर खान, शांता धांडे, वैशाली मेश्राम, विजया बच्छाव, आशा देशमुख, वैशाली रामटेके, विमल कातकर, कलाकार मल्लारप, जितेश कुळमेथे, विलास वनकर, विश्वजीत शाहा, अजय दुर्गे, सलीम शेख, आनंद रणशूर, हरमन जोसेफ, विनोद अनंतवार, आनंद इंगळे, गौरव जोरगेवार सहभागी झाले होते.
महागाईविरोधात यंग चांदा ब्रिगेडचा जनआक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST