शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

योग जीवनपद्धती आहे - पाटील

By admin | Updated: May 13, 2014 23:25 IST

योग अभ्यासाचे धडे बालवयातच गिरविले तर, मुलांवर योग्य संस्कार होते. योगाकरिता वेगळा वेळ काढण्याची आवश्यकता नाही, तो मनापासून अंगिकारावा लागतो.

वरोरा : योग अभ्यासाचे धडे बालवयातच गिरविले तर, मुलांवर योग्य संस्कार होते. योगाकरिता वेगळा वेळ काढण्याची आवश्यकता नाही, तो मनापासून अंगिकारावा लागतो. योग ही जीवनपद्धती आहे. असे मत, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, योग व नैसर्गिक उपचार पद्धती विभागाचे प्रमुख डॉ. सुर्यकांत पाटील यांनी व्यक्त केले.

लोकमान्य सांस्कृतिक मंडळ व चंद्रपूर जिल्हा योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

लोकमान्य विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्रीकांत पाटील होते. संस्थेचे कार्यवाह श्रीकृष्ण घड्याळपाटील व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील प्रा. प्रशांत गुलस्के यांची उपस्थिती होती.

प्रा.गुलस्के यांनी मुलांच्या संस्कारावर भर देत पालकांनी मुलांच्या संरक्षणावरही लक्ष द्यावे, असे सांगितले. मुलांवरील लैंगिक अत्याचारामध्ये वाढ झाली असून तो परिचित व्यक्तीकडून अधिक होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे ते म्हणाले.

प्रा. श्रीकांत पाटील यांनी योगामुळे शरीराची शुद्धी होते. मनाची शुद्धी आणि चित्त शुद्धी होते. समाजातील वाढत्या सामाजिक व सांस्कृतिक प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी योग अभ्यास आवश्यक आहे. मागील आठ वषार्ंपासून सतत होत असलेल्या या शिबिराचे त्यांनी कौतुक केले. ७ ते १७ वयोगटातील ५५ शिबिरार्थी यात सहभागी झाले. योग पट्टूंनी सुर्यनमस्कार, मधुराष्ट्रक, पांडुरंग स्तोत्र, यासह विविध आसनांचे प्रात्यक्षिक याप्रसंगी केले. योग नृत्य व कला शिक्षकांनी रेखाटलेली रांगोळी वेधक होती. कौस्तुभ रामगुंडावार, मयुरी बांगडे, शुभांगी बोबडे व दानिया शेख यांचा यावेळी उत्कृष्ठ योगपटू म्हणून सत्कार करण्यात आला. प्रा. उत्तम देवूळकर, मकरंद घोटकर, स्मिता धोपटे, सुनील बांगडे, अनिल घुबडे आदींनी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले. े संचालन शुभांगी नक्षिणे, प्रास्ताविक तुषार अडोणी तर, आभार राहूल राखे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)