सुधीर मुनगंटीवार : चंद्रपुरात योगदिन उत्साहात साजराचंद्रपुर: गेल्या काही वर्षंत झालेल्या सामाजिक बदलामुळे व बैठ्या जीवन शैलीमुळे ताणतणाव वाढले असून याचा परिणाम आरोग्यावर झाला आहे. यावर योग हा उत्तम उपाय असून योगा निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली असल्याचे मत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी येथे व्यक्त केले. योगा ही नियमित प्रकिया असून योगाला जीवनशैली बनविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित जागतिक योगदिन कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, जि. प. अध्यक्षा संध्या गुरुनुले, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवान सीईओ डॉ. महेंद्र कल्याणकर यावेळी उपस्थित होते. समाजातील ताणतणावाचे नियोजन योग्यवेळी करणे आवश्यक झाले आहे. या नियोजनाच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या योगसाधनेचा मोठ्या प्रमाणात अंगीकार व्हावा म्हणून जागतिक योगदिनाचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले. समाजातील योग संबधी जागरूकता वाढविणे व शारीरिक तसेच मानसिक सशक्तीचे काम ही योग चळवळ करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. योगाला केंद्र सरकारने जागतिक दर्जा प्राप्त करुन दिला असून शारीरिक व मानसिक रोगावर सहज विजय मिळविता येतो. जीवनात पूर्ण समाधान मिळवून देण्याची शक्ती योगात आहे. म्हणून आज जागतिक योग दिनानिमित्त निरोगी आयुष्याच्या संकल्प करु, या असे आवाहन ना. अहीर यांनी केले. आज चंद्रपुर शहरासह जिल्हाभरात असंख्य ठिकाणी सामूहिक योग करुन जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)
योगा म्हणजे निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली
By admin | Updated: June 22, 2015 01:06 IST