शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
5
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
6
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
7
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
8
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
9
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
10
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
11
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
12
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
13
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
14
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
15
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
16
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
17
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
18
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
19
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
20
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

ब्रह्मपुरीच्या तापमानात यावर्षी वाढ

By admin | Updated: June 9, 2014 23:34 IST

ब्रह्मपुरीच्या वाढत्या तापमानाला रोखण्यासाठी प्रशासन व नागरिकांना सहभाग आवश्यक आहे. विदर्भात ब्रह्मपुरीच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. पुढेही हिच स्थिती कायम राहिली तर, येत्या काही काळात

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरीच्या वाढत्या तापमानाला रोखण्यासाठी प्रशासन व नागरिकांना सहभाग आवश्यक आहे. विदर्भात ब्रह्मपुरीच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. पुढेही हिच स्थिती कायम राहिली तर, येत्या काही काळात ब्रह्मपुरीचे वाळवंट होण्याची चिन्ह दिसत आहेत. ते होऊ नये यासाठी झाडे लावून पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात वृक्षांची संख्या अतिशय कमी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून वृक्षारोपण करण्यात आले नाही. झाड लावून मोकळे होणे एवढय़ापर्यंतचे मात्र काम कायम आहे. झाडे लावल्यावर त्यांना जगविण्याचे कार्य होत नाही. अनेक खुल्या क्षेत्रावर अतिक्रमण आहेत. ते काढून प्रशासनाच्या वतीने झाडे लावून जगविणे आवश्यक आहे. रस्त्यांच्या कडेला लावण्याचे कार्य होत नाही. शहराच्या बाहेर मोकळ्या जागा ओसाड आहेत. त्यामुळे तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे.ब्रह्मपुरीची जमीन खडकाळ व वाळू मिश्रीत आहे. लाल रंगाची माती असल्याने ती जास्त तापत असते. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे, ब्रह्मपुरी शहरात व खुल्या जमिनीवर लावणे आवश्यक आहे. सामाजिक वनीकरणाचे येथे कार्यालय आहे. परंतु झाडे लागवडीचे कार्य त्यांच्याकडूनही नगण्यच आहे. अनेक कार्यालयांना समोर खुले मैदान आहेत. परंतु झाडे लावून जगविणे अधिकार्‍यांनाही सुचले नाही. त्यामुळे शहरच्या तापमानात वाढ झाली आहे.येत्या पावसाळ्यात नगरपालिका अन्य सामाजिक संस्था व सामाजिक संघटना यांना एकत्र घेऊन झाडे लावल्याचा प्रभावी कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाही तर ब्रह्मपुरी शहर येत्या काही वर्षात वाळवंत झाल्याशिवाय राहणार नाही. हे दोन ते तीन दिवसांच्या तापमानाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. (प्रतिनिधी)