शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या गणेशोत्सवातून डीजे करा बाद

By admin | Updated: September 3, 2016 00:31 IST

ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत डीजे वापरू नका, अशा पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला चंद्रपुरातील गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

 पोलिसांचे आवाहन : गणेश मंडळांनीही दिले आश्वासनचंद्रपूर : ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत डीजे वापरू नका, अशा पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला चंद्रपुरातील गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपली सामाजिक व नैतिक जबाबदारी ओळखून गणेश उत्सवादरम्यान डीजे न वाजविण्याचे मंडळांनी आश्वासन दिले आहे. मंडळांनी हे आश्वासन पाळले तर ध्वनी प्रदूषण रोखण्यात चंद्रपूर जिल्हा एक आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.गुरुवारी पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथील ड्रील शेड येथे जिल्हा शांतता समिती, एनजीओ, पत्रकार तसेच जिल्ह्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय पुढे आला.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, उपायुक्त विजय इंगोले, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत उपस्थित होते. यावेळी संदीप दिवाण यांनी आगामी गणेशोत्सव मंगलमय व ध्वनी प्रदूषणमुक्त कसा होईल, यावर मार्गदर्शन केले. ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत न्यायालयसुद्धा आग्रही आहे. कायद्याचे उल्लंघन झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे त्यांना निर्देश देण्यात आल्याचेही ते म्हणाले.एका मंडळासाठी तीन वाहनेविसर्जन मिरवणुकीसाठी एका मंडळाला यंदा तीनपेक्षा जास्त वाहनाची परवानगी देण्यात येणार नाही, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या नियमांमध्ये व कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये कोणताही भेदभाव मंडळाची प्रतिष्ठा पाहून केला जाणार नाही, असेही पोलीस विभागाकडून या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.मनपातर्फे २० कृत्रिम तलावमनपाद्वारे विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. विसर्जनादरम्यान प्रसाद वाटप करण्याकरिता रस्त्यावर स्टॉल लावण्याची परवानगी देण्यात येणार नाही, जल प्रदूषण रोखण्याकरिता मनपाकडून २० कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.