वरोरा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने वरोरा शहरात एक वर्षापूर्वी अनेक कामांचे भूमीपूजन करण्यात आले. त्या कामाला अद्यापही सुरूवात करण्यात आली नसल्याने काम सुरू होणार किंवा नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम व्यक्त केल्या जात आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सुरू असलेला हा प्रकार विकासाला बाधा आणणारा असल्याच्या प्रतिक्रीया येथे व्यक्त होत आहे.वरोरा शहरातील क्रमांक दोनमध्ये येणाऱ्या अभ्यंकर प्रभागातील अभ्यंकर वार्ड, शहीद वीर बापुराव शेडमाके वॉर्डातील खुल्या जागेचे सौदर्यीकरण बाल उद्यान विकासाकरिता २१ लाख व रस्त्याचे खडीकरण तसेच पाच ्ँअंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण या कामाकरिता ५५ लाख रुपये मागील वर्षात मंजूर झाल्याने त्याचे भूमीपूजन करण्यात आले. परंतु यामधील खुल्या जागेचे सौदर्यीकरण व बाल उद्यान विकासाचे काम आजपर्यंत सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिक संभ्रमात पडले आहेत.रस्त्याची कामे निकृष्ठ दर्जाचेमंजुर रस्त्याची कामे अर्धवट असुन अनेक रस्त्याची कामे निकृष्ठ दर्जाची करण्यात आल्याने अल्पावधीत रस्ते उखडले आहेत. त्यामुळे निकृष्ठ दर्जाची रस्ते तयार झाल्याने अभ्यंकर प्रभागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खुल्या जागेतील विकासाची व बाल उद्यान विकसित करण्याच्या कामांना पावसाळ्यापूर्वी प्रारंभ करावा तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याची कामे निकृष्ठ दर्जाची असल्याने या कामाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा अभ्यंकर प्रभागाचे नगरसेवक छोटु शेख यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
एक वर्षापूर्वी भूमिपूजन झालेले शहरातील कामाला प्रारंभ नाही
By admin | Updated: May 10, 2015 01:08 IST