शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापूर्वीच मनपाला रामाळातील प्रदूषणाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 05:00 IST

ऐतिहासिक रामाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे तलावाचे अस्तित्व नष्ट होत असून, या पाण्यामुळे मानवासह इतर पशुपक्षांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, तलाव भरल्यानंतर ते पाणी लगेच नदीत जाऊन नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देप्रदुषण मंडाळाने पाण्याचे नमूने घेण्यापूर्वीच प्रदूषणाची कळविली दाहकता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धन तसेच प्रदूषणाबाबत इको-प्रोने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात आता  सामाजिक संघटनांसह सामान्य नागरिकही जुळत आहे. दरम्यान, रामाळा तलावातील प्रदूषणाची पातळी मोठी असून, ते पाणी पिण्यायोग्य नसून, जलचल प्राण्यांनाही धोकादायक ठरत आहे. यासंदर्भात वर्षभरापूर्वीच म्हणजे, १४ फेब्रुवारी २०२० लाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून अवगत केले होते. मात्र महापालिका प्रशासनाने या पत्राकडे दुर्लक्ष केल्याचे आता समोर आले आहे.येथील ऐतिहासिक रामाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे तलावाचे अस्तित्व नष्ट होत असून, या पाण्यामुळे मानवासह इतर पशुपक्षांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, तलाव भरल्यानंतर ते पाणी लगेच नदीत जाऊन नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले.विशेष म्हणजे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ५ मार्च २०२० तसेच १३ मार्च २०२० ला तलावाच्या पाण्याचे नमुने घेतले होते. या नमुन्याच्या पृथ्थकरण अहवालातून बीओडीचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे. घरगुती सांडपाण्यामुळे ते प्रमाण वाढण्याची शक्यताही व्यक्त केली होती. तसेच एसएस, टीडीएस, आर्यन, शिशे आदीचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचेही नमूद केले होते. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २५ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मनपाने वर्षभर काहीच का केले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.नमुने घेण्यापूर्वीच मनपाला पत्रमहाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ५ मार्च २०२० तसेच १३ मार्च २०२० ला रामाळा तलावाच्या पाण्याचे नमुने घेतले होते. यापूर्वीच म्हणजे १४ फेब्रुवारी २०२० ला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने महापालिका प्रशासनाला  पत्र पाठवून पाणी प्रदूषित असल्याचे कळविले होते. हे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने २५  फेब्रुवारी २०२१ ला जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रातून स्पष्ट होत आहे. प्रदूषण मंडळाने तत्परता दाखविली असतानाही महापालिका प्रशासनाने रामाळा तलावातील प्रदूषणाकडे मात्र दुर्लक्ष केले आहे.

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण