शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिची सुरक्षा एजन्सी निविदेविनाच

By admin | Updated: June 8, 2016 00:43 IST

वेकोलि वणी क्षेत्रात कार्यरत अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे बेकायदेशीररित्या नियमबाह्य खाजगी सुरक्षा (सिक्युरिटी) एजन्सीचे सुरक्षा कर्मचारी सुरक्षा व्यवस्था सांभाळत असल्याची ...

सात दिवस लोटूनही टेंडर नाही : वेकोलिचे बेजबाबदार धोरणघुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्रात कार्यरत अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे बेकायदेशीररित्या नियमबाह्य खाजगी सुरक्षा (सिक्युरिटी) एजन्सीचे सुरक्षा कर्मचारी सुरक्षा व्यवस्था सांभाळत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यावरून वेकोलिचे अधिकारी खाणीच्या सुरक्षेबाबत किती गंभीर आहेत, हेखील स्पष्ट झाले आहे. वेकोलि वणी क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून वेकोलिच्या सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत खासगी सुरक्षा एजन्सी सांभाळत आहे. वणी क्षेत्रात खासगी एजन्सीमार्फत २४० सुरक्षा कर्मचारी विविध खाणीत कार्यरत आहेत. त्यांपैकी ४० कर्मचारी पैनगंगा कोळसा खाणीत तर उर्वरित सुरक्षा कर्मचारी उर्जाग्रामच्या क्षेत्रीय मुख्य महाव्यवस्थापक कार्यालय, घुग्घुस, नायगाव, निलजई, उकणी, मुंगोली, कोलगाव कोळसा खाण क्षेत्रात सुरक्षेची जबाबदारी पार पाडत आहेत. या विभागात वेकोलिच्या सुमारे १०० सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. वेकोलितील सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त काम करूनसुद्धा पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जात नाही. दरवर्षी खासगी सुरक्षा एजन्सीसाठी निविदा वेकोलिकडून काढली जाते. पैनगंगा कोळसा खाणीचा मागील वर्षीच्या सुरक्षा एजंसीचा करार ३० मे रोजी संपला. त्या क्षेत्रात ४० सुरक्षा कर्मचारी खासगी सुरक्षा एजन्सी असल्याचे कळते, तर उर्वरित क्षेत्राचा कार्यकाळ ६ जूनला संपला. निविदा संपण्यापूर्वीच वेकोलिने आवश्यक ती कारवाई करण्याची गरज होती. मात्र ती न केल्याने क्षेत्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आणि कालबाह्य झालेल्या एजन्सीच्या नियमबाह्य कर्मचाऱ्यांवर पुढील व्यवस्था होईपर्यंत सुरक्षेची जबाबदारी सोपविण्याची वेळ आली. सुरक्षा व्यवस्थेसारख्या गंभीर विषयाबाबत वेकोलिच्या अधिकाऱ्यांचे बेजबाबदार धोरण चर्चेचा विषय ठरले आहे. याबाबत वेकोलिच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. तर वेकोलि वणी क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव दास खाजगी कामकाजासाठी रजेवर असून विदेशात असल्याचे कळले. (वार्ताहर)