शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

चुकीच्या अहवालाने २५ लाखांचा खर्च व्यर्थ

By admin | Updated: May 25, 2014 23:29 IST

नॉन हाचकिन्स लिंफोमा कॅन्सर’ या आजाराने ग्रस्त असताना २३ वर्षीय इंदरसिंह वधावन या रुग्णास ‘हाचकिन्स लिंफोमा’ (कॅन्सर) आजार असल्याचा चुकीचा अहवाल देणार्‍या लॅब संचालकांवर

चंद्रपूर : ‘नॉन हाचकिन्स लिंफोमा कॅन्सर’ या आजाराने ग्रस्त असताना २३ वर्षीय इंदरसिंह वधावन या रुग्णास ‘हाचकिन्स लिंफोमा’ (कॅन्सर) आजार असल्याचा चुकीचा अहवाल देणार्‍या लॅब संचालकांवर कारवाई करून त्यांची अनुज्ञप्ती परवाना रद्द करण्याची मागणी रुग्णांचे वडील हरचरणसिंह वधावन यांनी पत्रकार परिषदेत केली.‘हाचकिन्स लिंफोमा’ आजार झाल्याचे निदान व लॅब अहवाल २0१२ ला चंद्रपूर येथील डॉ. चिद्दरवार यांनी दिला होता. याच अहवालाशी साधम्र्य असणारा अहवाल एस.आर.एल. लेबॉरेटरी नागपूर शाखेमार्फत मुंबई येथील एम.आर.एल. लॅबने दिला. चुकीच्या अहवालाला अनुसरून तब्बल वर्षभर इंदरसिंह याच्यावर किमोथेरपीद्वारा उपचार करण्यात आला. या दरम्यान ११ किमोथेरेपी करण्यात आल्या.२0१३ मध्ये रुग्णाच्या शरीराला गाठी उद्भवल्याने डॉ. वरगंटीवार यांच्या दवाखान्यात गाठीची शस्त्रक्रिया करून गाठी डॉ. चिद्दरवार यांच्या लॅबमध्ये परीक्षणाकरिता पाठविल्या. तेव्हासुद्धा त्यांनी ‘हाचकिन्स लिंफोमा’ कॅन्सरचा आजार असल्याचा अहवाल दिला. आजार पुन्हा उद्भवल्याने नागपूरच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला बंगलोर येथील एच.सी.एल. कॅन्सर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी डॉ. चिद्दरवार यांनी तपासलेल्या गाठी व त्याचे स्लाइड बंगलोर येथे मागवून त्या गाठी तपासून रुग्णास हाचकिन्स लिंफोमा हा आजार नसून ‘नॉन हाचकिन्स लिंफोमा’ आजार जडल्याचे सांगितले. त्यावर बोनमेरो ट्रान्सप्लांट ही उपचारपद्धती असून, हेवी किमा करून आजारावर प्रतिबंध घालणे शक्य असल्याचे सांगितले. पॅथॉलॉजिस्टच्या चुकीच्या निदानामुळे व त्यांनी दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे उपचारासाठी २५ लाख रुपये पाण्यात गेले. या कालावधीत मानसिक, आर्थिक व प्रचंड शारीरिक त्रास सहन करावा लागल्याने याची भरपाई द्यावी, अन्यथा कायदेशीर दावा ठोकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित लॅब चालकावर रुग्णाच्या उपचाराकरिता विनाकारण खर्च झालेल्या २५ लाखांसह मानसिक व आर्थिक त्रासापोटी ५0 लाख, असा एकूण ७५ लाख रुपयांचा कायदेशीर दावा दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. वधावन यांनी सांगितले, मुलगा इंदरसिंह वधावन यास

यासंदर्भात संबंधितांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. (नगर प्रतिनिधी)