शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांच्या लेखण्या विवेकनिष्ठ व्हाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:18 IST

आंबेडरवादी साहित्य चळवळीचे फार मोठ योगदान मराठी व भारतीय संस्कृतीला मिळाले आहे. या काव्यकारांच्या व साहित्य चळवळीच्या माध्यमातून आंबेडकर साहित्य ग्रामीण भागात पोहचले आहे. आता साहित्यिकाच्या लेखण्याही विवेकनिष्ठ व्हाव्यात, असे आवाहन विचारवंत, तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

ठळक मुद्देश्रीपाल सबनीस : आंबेडकरवादी साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : आंबेडरवादी साहित्य चळवळीचे फार मोठ योगदान मराठी व भारतीय संस्कृतीला मिळाले आहे. या काव्यकारांच्या व साहित्य चळवळीच्या माध्यमातून आंबेडकर साहित्य ग्रामीण भागात पोहचले आहे. आता साहित्यिकाच्या लेखण्याही विवेकनिष्ठ व्हाव्यात, असे आवाहन विचारवंत, तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळद्वारा पहिले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन चिमूर येथील शेतकरी भवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी येथे शनिवारी आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्घ साहित्यिक व विचारवंत प्रा.दीपककुमार खोब्रागडे होते. उदघाटन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसीध्द नाटककार प्रेमानंद गज्वी, संघरामगीरीचे संघनायक भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, अ‍ॅड. भुपेश पाटील, सुरेश डांगे, डॉ.धनराज खानोरकर, साहित्यिक ना.गो.थुटे, आत्माराम ढोक, विद्याधर बन्सोड, प्रा. वामन शेळमाके, किशोर गजभीये, शुध्दोधन कांबळे, महेश मोरे उपस्थत होते.क्रांतीभूमीत दोन दिवस चालनाऱ्या साहित्य संमेलनादरम्यान इंदिरा नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते राष्ट्रसंत साहित्यनगरीपर्यत प्रथम संविधान गौरवरॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी तुकडोजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा साकारून नागरिकांचे लक्ष वेधले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करून क्रांतीभूमीतील पहिल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ.धनराज खानोरकर यांच्या ‘मास्तर मातीचे’ या काव्यसंग्रहाचे, डॉ. भुपेश पाटील यांच्या ‘जेव्हा गाव पेटून उठतो तेव्हा’, भानुदास पोपटे यांच्या ‘राष्ट्रीय अभंगवाणी’ या काव्यसंग्रहाचे व विद्याधर बन्सोड, अनंता सूर आदींचे पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.संमेलन परिसरात पुस्तकाचे स्टॉलदोन दिवस चालणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नागरी परिसरात पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले असून अनेकजण येथून हजारोंची पुस्तके खरेदी करीत असल्याची माहिती येथील विक्रेत्यांनी दिली.