शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

डाटाबेसमधील त्रुट्यामुळे शिक्षकांची तारांबळ

By admin | Updated: August 6, 2015 02:01 IST

राज्यातील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची संख्या एका क्लिकवर तालुका ते राज्य स्तरावरील अधिकाऱ्यांना पाहता यावी व शिक्षण विभागाकडून शाळांना ...

अशैक्षणिक कामांचा बोजा वाढला : संगणकाबाबत शिक्षकही अज्ञानीआशिष देरकर गडचांदूरराज्यातील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची संख्या एका क्लिकवर तालुका ते राज्य स्तरावरील अधिकाऱ्यांना पाहता यावी व शिक्षण विभागाकडून शाळांना वारंवार मागण्यात येणाऱ्या कागदपत्रांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने सरलच्या माध्यमातून डाटाबेस प्रणाली विकसित करण्यात आली. मात्र वेबसाईटमध्ये अनेक दोष असल्यामुळे शिक्षकांची तारांबळ उडाली आहे. ी४िूं३्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर २ूँङ्मङ्म’ या विकल्पात माहिती भरताना जास्तीत जास्त वेळा वेबसाईट व्यस्तच असते. काही मोठ्या शाळांमध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे दाखल खारीज वेगवेगळे असतात. अशावेळी प्राथमिक आणि उच्च माध्यमिकचा दाखल खारीज क्रमांक सारखा येत असल्यामुळे सदर क्रमांक पूर्वीच वापरात आला असल्याचा संदेश स्क्रीनवर येतो. त्यामुळे शिक्षकांनी अशावेळी करावे काय, असा प्रश्न पडतो. अनेक मुख्याध्यापकांनासुद्धा याबाबत कल्पना नसल्यामुळे शिक्षकांना समस्या सोडविताना अडचण निर्माण होत आहे.शासनाने पूर्वी विद्यार्थ्याची एकूण वेगवेगळी ८० माहिती असणारा फार्म भरण्यास सांगितले होते. मात्र दिलेल्या वेळेत ते शक्य नसल्यामुळे त्याचे तीन टप्प पाडण्यात आले. पहिल्या टप्प्यात आता फक्त १५ माहितीचा फार्म भरण्याच्या सूचना सर्व शाळांना प्राप्त झाल्या आहेत. असे असले तरी शिक्षकांसमोर अजूनही अनेक अडचणी आहे. शासनाने वेबसाईटवर वयाच्या बाबतीतसुद्धा मर्यादा घातल्या आहे. अनेक विद्यार्थी उशिरा दहावी पास झाले. त्यामुळे त्यांनी शिकायचे नाही का, असाही शिक्षकांचा प्रश्न आहे. कारण १९९५ च्या अगोदरची जन्मतारीख असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती या प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येत नसल्याचे दिसते. शासनाने वेबसाईटवरील दोष दूरुस्त केल्यास शिक्षकांना माहिती भरणे सोपे जाईल. कारण गेल्या वर्षीसुद्धा आॅनलाईन संच निर्धारण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शासन निर्णयानुसार विद्यार्थी संख्या विचारात घेण्यात आली नव्हती. त्यामुळे शिक्षण विभागाचा तो प्रयोग अयशस्वी ठरला होता. शासनाचा नवीन प्रयोग अतिशय चांगला असला तरी त्यातील त्रुट्या दूर होणे आवश्यक आहे.शाळांना संगणक व इंटरनेट आवश्यकआरटीईनुसार कितीही दुर्गम भागातील शाळा असली तरी व्यवस्था नसतानाही काही शाळांनी संगणक व इंटरनेट असल्याची माहिती शासनाला दिली आहे. त्यामुळे कोणतीही शाळा आमच्याकडे संगणक व इंटरनेटची सुविधा नाही, अशा प्रकारची तक्रार आता करु शकणार नसल्याचे समजते. त्यामुळे जिवतीसारख्या दुर्गम भागातील शिक्षकांची गैरसोय होत आहे. माहिती शाळेतच भरण्याचे आदेशशाळेची माहिती गोपनीय व महत्वाची असल्यामुळे इतर ठिकाणी जाऊन माहिती भरण्यास मनाई आहे. कारण मुख्याध्यापक व शिक्षकांना युजरनेस व पासवर्ड देण्यात आला आहे. तो इतरांना माहीत झाल्यास गैरवापर होण्याची शक्यता आहे. मात्र ज्या शाळांकडे पर्याय नाही, त्यांनी तर शाळाबाह्य व्यक्तीला माहिती भरण्याचे टेंडरच दिले आहे.बोगस विद्यार्थ्यांवर आळा घालण्यासाठी आधारअनेक शाळांमध्ये आजही बोगस विद्यार्थी दिसून येतात. आश्रमशाळांचे प्रमाण यामध्ये जास्त आहे. डाटाबेस प्रणालीमुळे बोगस विद्यार्थी संख्येवर आळा बसणार असून विद्यार्थी प्रवेश क्रमांक व आधार क्रमांक जोडला जाणार आहे. त्यामुळे बोगस विद्यार्थी संख्या दाखवून शासनाचे अनुदान घेणाऱ्या संस्थाचालकांचे मनोबल खचले आहे. शिक्षकही अशिक्षित !प्रत्येक वर्ग शिक्षकांना स्वत: संगणकावर इंटरनेटच्या माध्यमातून माहिती भरायची असल्यामुळे ज्या शिक्षकांनी कधी संगणकाला हात लावला नाही, अशाही शिक्षकांवर ‘माऊस’ पकडण्याची वेळ आली आहे. शिकवित आलेल्या विषयात पारंगत असलेले अनेक शिक्षक संगणकाच्या बाबतीत मात्र अशिक्षित आढळत आहे.