शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

हृदयाच्या तळमळीतूनच लेखन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:15 IST

साहित्य हे जीवनाच्या धडपडीतून आणि ह्रदयाच्या तळमळीतून निर्माण झाली पाहिजे.

ठळक मुद्देअशोक पवार : राजुरा येथे तेजस्विनी साहित्य पुरस्कार, कवी संमेलन

आॅनलाईन लोकमतगोवरी : साहित्य हे जीवनाच्या धडपडीतून आणि ह्रदयाच्या तळमळीतून निर्माण झाली पाहिजे. समाजात जगताना दाहक आणि आल्हाददायक अनुभव येत असतात. मात्र, सामाजिक वास्तव साहित्यातून मांडत असताना हृदयाची तळमळ असावी लागते, असे मत प्रसिद्ध कादंबरीकार अशोक पवार यांनी व्यक्त कले. राजूरा येथील स्वामी विवेकानंद सभागृहात तेजस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार वितरण व कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा अल्लूरवार यांनी उद्घाटन केले. स्वागताध्यक्ष उमाकांत धांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रावण बाळ योजनाचे अध्यक्ष सतीश धोटे, जि. प. सदस्य सुनील उरकुडे, नत्थू बोबडे, किशोर कवठे उपस्थित होते. अशोक पवार यांनी साहित्याच्या विविध प्रवाहांवर भाष्य केले. अष्टपैलू व्यक्तिमत्व साहित्यिक पुरस्कार डॉ. बळवंत भोयर, रामचंद्र धोटे स्मृती कादंबरी पुरस्कार आचार्य विजया मारोतकर, वाघुजी गावंडे स्मृती कथासंग्रह पूरस्कार डॉ. बाबुराव उपाध्ये, वामनराव गड्डमवार स्मृती समीक्षा पुरस्कार बाळू दुगदुमवार, शांताबाई बोबडे स्मृती काव्य पुरस्कार डॉ. माधव जाधव, हनुमंत चिल्लावार स्मृती आत्मकथन पुरस्कार डॉ. जयप्रकाश घुमटकर, तर कल्याण तेजस्विनी साहित्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रीती वडनेरकर, डॉ. राजकुमार मुसने, अविनाश पोईनकर, प्रा. चित्रा देशमुख, नरेशकूमार बोरीकर आदींना प्रदान करण्यात आला. परिक्षक डॉ. अनंता सूर म्हणाले, साहित्यातून समाजातील वास्तव मांडावे. वास्तवदर्शी साहित्य अमर होईल. साहित्य हे समाजमन चेतविण्याचे काम करते. खºया साहित्यातून समाजाला दिशा मिळते, असे मत व्यक्त केले. संचालन वर्षा कोल्हे-जवळे व प्रास्ताविक संगीता धोटे यांनी केले. प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात पंढरपूर येथील कवयित्री स्वाती भोंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. यावेळी कवींनी बहारदार कविता सादर केल्या. संचालन नरेशकुमार बोरीकर यांनी केले. कार्यक्रमाला कवी, साहित्यिक आणि रसिक उपस्थित होते.