शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अश्वांच्या पाठीवर फिरतो मेंढपाळांचा संसार

By admin | Updated: January 15, 2015 22:48 IST

९०० मेंढ्या, २५ अश्व आणि २० कुटुंब हा काफीला आहे, त्या मेंढपाळांचा ज्यांच्या नशिबी आयुष्यभर भटकंतीच आली आहे. हा व्यवसाय पारंपारीक व्यवसाय म्हणून जरी त्यांनी स्वीकारला असला तरी

संरक्षणासाठी श्वान : विकास योजनांपासून दूर सचिन सरपटवार - भद्रावती ९०० मेंढ्या, २५ अश्व आणि २० कुटुंब हा काफीला आहे, त्या मेंढपाळांचा ज्यांच्या नशिबी आयुष्यभर भटकंतीच आली आहे. हा व्यवसाय पारंपारीक व्यवसाय म्हणून जरी त्यांनी स्वीकारला असला तरी या व्यवसायातून त्यांची सर्वांगीण प्रगती झाल्याचे दिसुन येत नाही. भटकंतीमुळे त्यांची लेकरं शिक्षणाच्या प्रवाहापासुन वंचीत राहिली. स्वातंत्र्य मिळून आज ६८ वर्षे झालीत, पण ही जमात अजुनही विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेली नाही. मंगळवारच्या दुपारी भद्रावती ते तेलवासा रस्त्यावर अगदी शिस्तप्रिय चालत असलेले २५ घोडे दिसून आले. घोड्यांसोबत त्यांचे मालक असलेले मेंढपाळही होते. या मेंढपाळांनी आपल्या भटकंती आयुष्याची माहिती ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली. या भटकंतीला त्यांनी गेल्या दसऱ्यापासुन सुरूवात केली आहे. सावरगाव जि. यवतमाळ येथील हे रहिवाशी आहेत. खताच्या दृष्टीने त्यांच्या मालकीच्या मेंढ्या शेतांमध्ये बसवणे व मागणी झाल्यास त्या मेंढ्या विकणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. जिथे मागणी होईल, तिथे थांबणे व त्याच ठिकाणी आपला संसार उभार करणे, हा त्यांचा नित्य नियम. या ठिकाणाहुन त्या ठिकाणापर्यंत त्यांचा हा संसार अश्वांच्या पाठीवर वाहून नेल्या जात आहे. या घोड्यांच्या पाठीवर ‘पडसी’ टाकण्यात आली असून पडसीच्या दोन्ही बाजुने जिवनावश्यक साहित्य ठेवण्यात आले आहे. संसाराला उपयुक्त असे स्वयंपाकाचे भांडे, जाळायला लहान लाकडं, अन्नधान्य तसेच पाण्याचे जार सुद्धा यात ठेवण्यात आले आहे. यासोबत कोंबड्या, बकरीचे पिल्लू सुद्धा यांचे सोबती आहेत. दोन वर्षाच्या मुलापासून ७५ वर्षांच्या आजी-आजोबा जीवनाच्या या प्रवासात सहभागी झाले आहेत. या सगळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सात ते आठ श्वानही त्यांच्या सोबत आहेत. ना थंडीची तमा, ना वन्यप्राण्यांची भिती, हे सगळं काही आहे, ते फक्त पोटासाठी असेही ते सांगतात.