शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक वारशाच्या मूर्र्तींची स्वच्छता

By admin | Updated: April 19, 2017 00:40 IST

‘जागतिक वारसा दिन’निमित्त ‘इको-प्रो’ संस्थेच्या इको-प्रो पुरातत्व संवर्धन शाखेने एतिहासिक वास्तु स्वच्छता व संवर्धनाबाबत मंगळवारी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला.

‘इको-प्रो’चाउपक्रम : किल्ला स्वच्छता अभियानाचा ४५ वा दिवसचंद्रपूर : ‘जागतिक वारसा दिन’निमित्त ‘इको-प्रो’ संस्थेच्या इको-प्रो पुरातत्व संवर्धन शाखेने एतिहासिक वास्तु स्वच्छता व संवर्धनाबाबत मंगळवारी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. यावेळी हनुमान खिडकी, किल्ला परिसर व लालपेठ-मातानगर भागातील अपूर्ण देवालयाच्या मूर्ती असलेला परिसर स्वच्छ केला. जगभरातील सुदंर आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण प्राचीन वास्तुना संरक्षण देणे आणिया वास्तुविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १८ एप्रिल ‘जागतीक वारसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. चंद्रपूर शहर व जिल्ह्यात मोठया प्रमाणात ऐतिहासिक वास्तु असून त्यात चंद्रपूरचा किल्ला, राजा बीरशहाची समाधी, अपूर्ण देवालय, विविध मंदिरे अस्तित्वात आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना इको-प्रो चे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे म्हणाले की, आज आपण आपल्या स्वाथार्साठी, गरजेपोटी या ऐतिहातिक वारसा नष्ट करीत आहोत. त्याच्या संरक्षणासाठी आता लोकलढा उभा राहिला पाहिजे. या वास्तु खंडहर आणी अतिक्रमण होण्यापासून वाचविणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. तर प्रा डॉ इसादास भडके यांनी सांगितले की, आपला गोंडकालीन इतिहास आणि ऐतिहासिक वारसा किल्लाच्या बुरूजाप्रमाणे ढासळत चालला आहे. त्याचे संवर्धन करणे आपले सर्वांचेच काम आहे. याकडे पुरातत्व विभागानेसुध्दा योग्य लक्ष घालून संवर्धन केले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले.या कार्यक्रमात प्रशांत बोराडे, नितीन बुरडकर, नितीन रामटेके, अब्दुल जावेद, विनोद दुधनकर, संजय सब्बनवार, सुमित कोहळे, राजू काहीलकर, बिमल शहा, सौरभ शेटये, हेंमत बुट्टन, हरिदास कोराम, आशू सागोळे, प्रमोद देवांगण, सचिन धोतरे, महेश होकर्णे, आशिष मस्के, सागर कावळे, अब्दुल हंफी आदींसह मातानगर अपूर्ण देवालय परिसरातील स्थानिक युवंक उपस्थित होते. (प्रतिनिधी)