शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

लैंगिक अत्याचार कायद्यावर कार्यशाळा

By admin | Updated: March 3, 2017 00:56 IST

जनता महाविद्यालयातील आंतरिक तक्रार समितीच्या (आयसीसी) वतीने ‘काम करण्याच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक अत्याचार

पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन : महिला व विद्यार्थिनींची जनजागृतीचंद्रपूर : जनता महाविद्यालयातील आंतरिक तक्रार समितीच्या (आयसीसी) वतीने ‘काम करण्याच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा - २०१३’ यावर कार्यशाळा घेण्यात आली. महाविद्यालयातील महिला कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिंनीमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.महाविद्यालयात आयसीसीचे पुर्नगठन करुन महिला लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा - २०१३ च्या निर्देशानुसार नवीन समिती गठित करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. अभय पाचपोर तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जुगलकिशोर सोमाणी, डॉ. पृथ्वीराज खिंची, आयसीसी अध्यक्ष डॉ. सरिता तिवारी, सदस्य डॉ. एन.आर. बेग, डी. यू. अडबाले उपस्थित होते. आयसीसीच्या सदस्या डॉ. नहिदा बेग यांनी लैगिंक अत्याचाराचे प्रकार, परिणाम व लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याविषयी महिला कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे आदीबाबत मार्गदर्शन केले.अ‍ॅड. अभय पाचपोर यांनी उपस्थित कर्मचारी व विद्यार्थ्यांना संवैधानिक अधिकार व या कायद्याची पार्श्वभूमी समजावून सांगत गुन्ह्यातील गंभीरता व कायद्याचे शिक्षणावर प्रकाश टाकला. यावेळी पावर पार्इंट प्रेझेंटेशनमार्फत उपस्थितांना लैंगिक अत्याचाराच्या श्रेणी, उच्च शैक्षणिक संस्थामध्ये कार्यरत महिला कर्मचारी व विद्यार्थी वर्ग यांच्यावर लैंगिक अत्याचार होत असतील तर त्यापासून संरक्षण, कायद्यातील तरतुदी, नियम, कायदा - २०१३ व अधिनियम- २०१६ या लैंगिक छळाच्या कायद्याबाबत जागृती व शिक्षकेबाबत माहिती, पीडितांनी घ्यावयाची काळजी विषयावरील विस्तृत माहिती दिली. चांदा शिक्षण मंडळाचे सचिव प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष यांच्या पुढाकारातून कार्यशाळा झाली. महाविद्यालयाच्या दर्शनी भागात तक्रार पेटी लावण्यात आली व त्याचे उद्घाटन डॉ. जुगलकिशोर सोमाणी यांचे हस्ते करण्यात आले. संचालन व आभार डॉ. निलिमा हजारे यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता प्रा. आय.एस. कोन्ड्रा, डॉ. कीर्ती वर्मा, प्रा. व्ही. एस. बोढाले, प्रा. मनिषा जेनेकर, प्रा. क्षमा गवई, प्रा. जावेश शेख, प्रा. सारडा तसेच प्रविण वासेकर, अविनाश धांदे, जी. आर. काळे, कालिचरण ढेंगळे, व्रिपा पाटील, शारदा पोडे, वैशाली लोंढे, वैशाली आवळे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)