शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

स्वास्थ, समृद्धी व आनंदाच्या रहस्यावर आज कार्यशाळा

By admin | Updated: May 21, 2016 00:56 IST

लोकमत सखी मंच राजुरा आणि गीता पाठशाला राजुरा, सत्संग सेवा समिती राजुरा, जेसीआय राजुरा रॉयल, राजस्थानी महिला मंडळ,....

ई.व्ही. गिरीश करणार मार्गदर्शन : सखी मंचतर्फे राजुरा येथे आयोजनराजुरा : लोकमत सखी मंच राजुरा आणि गीता पाठशाला राजुरा, सत्संग सेवा समिती राजुरा, जेसीआय राजुरा रॉयल, राजस्थानी महिला मंडळ, आर्य वैश्य समाज महिला मंडळ राजुरा, राजुरा महिला मंडळ राजुरा, नाभिक समाज महिला मंडळ राजुरा, पद्मशाली समाज महिला मंडळ राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयद्वारा आयोजित मुंबईचे वक्ते प्रा. इ. व्ही. गिरीश यांची एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा उद्या २१ मे शनिवारला आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ६.३० वाजता शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे कार्यक्रम होणार आहे. या शिबिरात स्वास्थ्य, समृद्धी आणि आनंदी राहण्याच्या रहस्याचा उलगडा करण्यात येणार असून आपल्यामध्ये असलेल्या ‘हिरो’ला ओळखा, संबंधात मधुरता, राजयोगाद्वारे स्रेहपूर्ण जीवन जगण्याची कला, स्वास्थ्य आपल्या हाती, सकारात्मक चिंतन, मुलांना उच्चशिक्षित करण्याची कला यासह अनेक विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. प्रा. ई. व्ही. गिरीश हे प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात १७ वर्षांपासून सेवा देत असून ही संस्था पाच महाद्विपामध्ये १३५ देशामध्ये कार्यरत आहे. नऊ हजार केंद्रांमधून मानव कल्याणकारी एक सशक्त पिढी घडविण्याचे काम अविरत सुरू आहे. प्रा.गिरीश यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), तारापूर आॅटोमिक ऊर्जा केंद्र, आयआयटी मद्रास, आयआयटी रुराकी, आयआयटी पटना, भारतीय वायु सेवासह अनेक ठिकाणी मार्गदर्शन केले आहे. मेडिटेशन, संकल्प, संबंध कर्मामध्ये मधुरता अवगत करण्याची कला, वर्तमान स्थितीमधील आव्हाने यावर मार्गदर्शन होणार असून हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आहे.शिबिराच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय उर्वरक व रसायन मंत्री हंसराज अहीर राहणार असून माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी प्रमुख वक्ते मुंबईचे प्रा. ई.व्ही. गिरीश, चंद्रपूर-गडचिरोली वणी क्षेत्राच्या राजयोगिनी ब्रह्माकुमारी कुसुमदीदी, मुख्य अतिथी म्हणून राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, सुभाष धोटे, सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष मंगला आत्राम, प्रभारी उपविभागीय अधिकारी धर्मेश फुसाटे, पर्यवेक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, नगर परिषद राजुराचे उपाध्यक्ष अरुण धोटे, राजयोगी ब्रह्मकुमार दीपकभाई, जि.प. सदस्य अविनाश जाधव, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे, राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार, प्राचार्य दौलतराव भोंगळे, माजी अध्यक्ष बंडू माणुसमारे उपस्थित राहणार आहेत. २१ मे रोजी सायंकाळी ६.३० ते ९ यावेळेवर मार्गदर्शन सुरू होणार असून मोफत व बहुमूल्य जीवन परिवर्तनाच्या या शिबिरात उपस्थित राहावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीकरिता संपर्क आनंद भेंडे (९२२६१५३८३९), प्रा. बी.यू. बोर्डेवार (९९२२९०४१२५), जयश्री देशपांडे (९६२३२३९३४३), कृतिका सोनटक्के (९९२२९३०१५१), संध्या पत्तेवार (९६२३८२९९८६), अनुराधा कल्लुरवा (९८२३८७४९१८), विवेक चौधरी (९६५७४०७४४९), शारदा गड्डम (९४०४१२५१९१), रंभा गोठी (०७१७३- २२३८०३), सुधा गुंडावार (९२७३३०३७६४), सुमन मसादे (९०१११७१८५०) यांच्याशी संपर्क साधावा. (शहर प्रतिनिधी)