शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

मनपा व जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:19 IST

शहर महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व समुचीत प्राधिकारी, सर्व सोनोग्राफी केंद्रधारक, सल्लागार समिती सदस्य व वैद्यकीय अधिकारी यांच्याकरिता गुरुवारी मनपा सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा पार पडली.

ठळक मुद्देपीसीपीएनडीटी कायद्याबाबत मार्गदर्शन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहर महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व समुचीत प्राधिकारी, सर्व सोनोग्राफी केंद्रधारक, सल्लागार समिती सदस्य व वैद्यकीय अधिकारी यांच्याकरिता गुरुवारी मनपा सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा पार पडली.कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनपा महापौर अंजली घोटेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपाचे उपमहापौर अनिल फुलझेले, आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहेरे, जिल्हा शल्य चिकित्सक उमेश नावाडे, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर आदी उपस्थित होते.डॉ. उमेश नावाडे प्रास्ताविकेत म्हणाले, भारतात पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी होत असून, या कायद्यातील तरतुदींचे कोटकोरपणे पालन करणे अंत्यत गरजेचे आहे. उपरोक्त कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येते. तेव्हा सदर कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यास सर्वानी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळेत मनपा चंद्रपूर व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर या कार्यक्षेत्रातील एकुण १८० ते २०० सभासदांचा सहभाग होता. त्यात पदाधिकारी, अधिकारी, सोनोग्राफी केंद्रधारक, वैद्यकीय अधिकारी, सल्लागार समिती सदस्य व इतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यशाळेचे संचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांनी व उपस्थिताचे आभार डॉ. अंजली आंबटकर यांनी मानले.यावेळी मनपा विधी अधिकारी अ‍ॅड. अनिल घुले व जिल्हा विधी समुपदेशक अ‍ॅड. मंगला बोरीकर यांनी पावर पार्इंट प्रसेंटेशनद्वारे पीसीपीएनडीटी कायद्यातील तरतुदीचे सादरीकरण केले. मनपा चंद्रपूर येथील सर्वसाधारण सभागृह येथे झालेल्या पिसीपिएनडीटी कार्यशाळेत मनपा आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या कार्यक्षेत्रातील पदाधिकारी, अधिकारी, डॉक्टरर्स, वैद्यकीय अधिकारी तसेच मनपाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.