शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय करणार नाही

By admin | Updated: November 15, 2014 01:31 IST

गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांनी आज (दि.१३) नागभीड येथे आढावा सभा घेतली. कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही,...

नागभीड : गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांनी आज (दि.१३) नागभीड येथे आढावा सभा घेतली. कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा खणखणीत इशारा त्यांनी या आढाव सभेत दिला.येथील पं.स.च्या बचत भवन सभागृहात संपन्न झालेल्या या सभेत खा. अशोक नेते यांनी प्रारंभी जे अधिकारी गैरहजर आहेत, अशांची नावे वाचून दाखविण्याची सूचना केली. जे अधिकारी विनापरवानगी गैरहजर आहेत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. याकारणे दाखवा नोटीसला संबंधित अधिकाऱ्याने आठ दिवसांतही उत्तर दिले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्या विभागाचा आढावा देत असताना कृषी सहायक गावात येत नसल्याची ओरड करण्यात आली. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे नागभीड तालुका सरसकट दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, असा ठराव यावेळी घेण्यात आला. पं.स.चे कृषी अधिकारी नितीन ऊईके आणि यू.जी. नैताम यांनीही आपल्या विभागाची माहिती यावेळी दिली.लघुपाटबंधारे विभागाचा आढावा उपअभियंता पी.एस. सुखदेवे यांनी सभेत केला. नागभीड तालुक्यात २९४ मामा तलाव असून या तलावांची सिंचन क्षमता ५९४ हेक्टर आहे. तालुक्यात बिकली, मौशी, तेलीमेंढा, उश्राळमेंढा येथे लघुपाट बंधारे योजना असल्याची माहिती सुखदेवे यांनी यावेळी दिली. यावेळी सर्व मामा तालवाच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना खासदार नेते यांनी दिला.मांगरूड येथील मामा तलावाच्या सांडव्याची उंची वाढविल्यावर तेथे चांगलीच समस्या निर्माण झाली आहे. यावर या सभेत चांगलेच मंथन करण्यात आले. घोडाझरी नहराची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. या नहराच्या दुरुस्तीसाठी निधीची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आढावा सभेत महिला बालविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभागासह विविध विभागाचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केला. या सभेस तहसीलदार, सभापती प्रा.डॉ. रेखा जगनाडे, उपसभापती मंदा पेंदाम, जि.प. सदस्या लीना पेंदाम, संजय गजपुरे, होमेदव मेश्राम, पं.स. सदस्य दिवाकर कामडी, अभय हांडेकर, ज्योत्सना वारजूकर, जहांगीर कुरेकर यांची यावेळी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)