शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे कामकाज प्रभावित

By admin | Updated: August 4, 2014 23:38 IST

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून विभागीय कर्मचारी संघटनेचे १ आॅगस्टपासून न्याय मागण्यासाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. परिणामी तहसील

संप सुरुच : तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचा पाठिंबाबल्लारपूर : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून विभागीय कर्मचारी संघटनेचे १ आॅगस्टपासून न्याय मागण्यासाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. परिणामी तहसील स्तरावरील कामकाज प्रभावित झाले असून नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या संपाला तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचा पाठिंबा दिला आहे.महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला. २० मे २०१३ रोजी निवेदनातून भावना व्यक्त केली. त्यावेळी सरकारने केवळ आश्वासन देऊन बोळवन केली. महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी राज्य सरकारच्या विरोधात लढा ऊभा करण्यास कर्मचारी संघटनेला भाग पाडल्याची भावना संघटनेचे पदाधिकारी शैलेंद्र धात्रक व अजय मेकलवार यांनी व्यक्त केली. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी संघटनेचे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जुलै महिन्यात कालबद्ध आंदोलन केले. यामध्ये काळ्याफिती लावून काम करणे, जिल्हाधिकाऱ्यांना ९ जुलै रोजी निवेदन दिले. १४ जुलैला एक दिवसासाठी लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. मात्र महसूल मंत्रालयाकडून काहीच तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. यामुळे महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी संतापले. अखेर १ आॅगस्टपासून बेमुदत संपावर गेल्याने महसूल प्रशासनातील कामकाजच ठप्प झाले आहे. याचा त्रास सामान्य जनतेला भोगावा लागत आहे. महसूल कर्मचारी संघटनेने नायब तहसीलदारांना राजपत्रीत अधिकाऱ्यांचा दर्जा देऊन ग्रेड पे वेतनात दुजाभाव केला आहे. यात वाढ करावी. लिपीकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक पदनाम करावे, महसूलविभागातील नायब तहसीलदार संवर्गातील पदे पदोन्नतीने भरण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.(शहर प्रतिनिधी)