शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना किमान वेतन मिळणार

By admin | Updated: January 26, 2017 01:38 IST

कंत्राटदारांनी मनपामधील कंत्राटी कामगारांना किमान वेतन द्यावे, यासह इतर २५ मुद्यांचे पालन कंत्राटदारांनी काटेकोरपणे करावे,

मनपा आयुक्तांचे आदेश : २५ निकष पाळण्याची सक्ती चंद्रपूर : कंत्राटदारांनी मनपामधील कंत्राटी कामगारांना किमान वेतन द्यावे, यासह इतर २५ मुद्यांचे पालन कंत्राटदारांनी काटेकोरपणे करावे, असा आदेश मनपा आयुक्त संजय काकडे यांनी जारी केला आहे. जर कंत्राटदारांनी या नियमाचे पालन केले नाही, तर ठेकदाराला पुढे ठेकेदारी मिळू शकणार नाही. त्यामुळे आता कामगारांना किमान वेतन मिळणार आहे. त्यामुळे कामगारांना सुगीचे दिवस येणार आहेत. कंत्राटी कामगारांना किमान वेतनासह, कामाचे नियम, कंत्राटदार परवाना, भविष्य निर्वाह निधी कायद्याची अंमलबजावणी, कामगारांचे सात तारखेपर्यंत पगार यासह २५ निकषांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी कंत्राटदारांना दिले. यासोबतच सुरक्षारक्षक मंडळाकडे कामगारांच्या नोंदणीसाठी पत्रव्यवहार आयुक्तांनी केला आहे. पूर्वी कंत्राटी कामगारांना तीन ते चार हजार रुपये पगार देण्यात येत होता. मात्र किमान वेतन कायद्याच्या आधारे कामगारांना १४ हजार रुपये प्रतिमाह वेतन मिळणार आहे. विशेष म्हणजे मनपा हद्दीत कार्यरत कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यासाठी विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या वतीने मागील अनेक वर्षापासून संघर्ष सुरु होता. मात्र आता मनपा आयुक्तांनी कंत्राटदारांना दिलेल्या आदेशामुळे कामगारांना किमान वेतनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आणखी संघटना प्रयत्नरत राहील, अशी प्रतिक्रिया विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्ष हर्षलकुमार चिपळूणकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. या आदेशामुळे मागील प्रलंबित किमान वेतन संबधित वसुली दाव्यांना गती येणार आहे. तसेच कामगारांना लाभ होत असल्यामुळे विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या वतीने मनपा आयुक्त संजय काकडे यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. (नगर प्रतिनिधी) हे आहेत निकष कंत्राटी कामगारांना किमान वेतन द्यावे, कामाचे नियम ठराविक असावे, भविष्य निर्वाह निधी कायद्याची अमलबजावणी करावी, नोंदणी दाखल्याचे दरवर्षी नुतनीकरण करावे, कंत्राटदारांनी कंत्राटी कामगारांची सेवा घेताना निविदेपूर्वी किमान वेतनाबाबत कामगार कल्याण विभागाचा अभिप्राय घ्यावा, कंत्राटदाराने कामगारांना कामाचे वेतन व त्यावरील इतर भत्ते रोख स्वरुपात अदा न करता संबंधित कामगारांच्या नावाने धनादेशाद्वारे अदा करावेत, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर होताना व कार्यालय सोडताना बायोमेट्रिक प्रणालीवर त्याची उपस्थिती दर्शवीणे अनिवार्य राहील, कंत्राटदारांनी सात तारखेच्या आत अदा करावे, मनपाकडून कंत्राटदारास बोनस दिला असेल, तर बोनसची रक्कम संबधीत कंत्राटदाराने कंत्राटी कामगारांना अदा करणे आवश्यक राहील, कामगारांच्या खात्यात वेतन देयक जमा केल्याची माहिती प्रतिमहिन्याला संबंधित कार्यालयात सादर करण्याची जबाबदारी कंत्राटदाराकडे राहिल, सदर माहिती सादर न केल्यास त्या महिन्याचे देयक अदा करण्यात येणार नसल्याचे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. कंत्राटी कामगारांना साप्ताहिक रजा द्यावी, त्या दिवसाचे वेतन कापता येणार नाही, यासह आदी निकषाचा समावेश आहे.