शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

चार महिन्यांपासून मजुरांची मजुरीसाठी पायपीट

By admin | Updated: May 30, 2016 01:10 IST

मध्य चांदा वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत झरण वनपरिक्षेत्रातील जंगली कामे करणाऱ्या वनमजुरांचे वेतन ...

झरण क्षेत्रातील कामे ठप्प : वनाधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूतकोठारी : मध्य चांदा वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत झरण वनपरिक्षेत्रातील जंगली कामे करणाऱ्या वनमजुरांचे वेतन मागील चार महिन्यांपासून करण्यात आले नाहीत. परिणामी मजुरात असंतोष पसरला असून पगारासाठी वनाधिकारी कार्यालय व वनाधिकाऱ्यांच्या निवासाभोवती मजुर उंबरठे झिजवित आहेत.झरण वनपरिक्षेत्रात जंगलातील विविध कामे मजुरांकडून केली जातात. त्यासाठी त्यांना रोजंदारी आणि शासकीय नियमानुसार ठरविल्याप्रमाणे मजूरी द्यायची असते. मागील चार महिन्यापासून जंगलात कडक उन्हात अंगमेहनतीची कामे मजुरांकडून सतत करवून घेण्यात आले. गोरगरीब मजुर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जंगली कामावर जात असतात. केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळाला तर कुटूंबाची आर्थिक समस्या निकाली निघेल, हिच आशा. मात्र काम करून महिना लोटला तरीही पगार नाही. पगारासाठी वनाधिकाऱ्यांना विचारणा केल्यास अ‍ॅडव्हान्स घ्या म्हणून मजुरांच्या हातावर अक्षता ठेवल्या जात असल्याचा प्रकार मागील जानेवारी महिन्यापासून सुरू आहे. (वार्ताहर)झरण क्षेत्राचा कारभार ढेपाळलाजानेवारी २०१६ मध्ये झरणचे वनाधिकारी पुलगमकर निवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन वनाधिकारी रूजू झाले. जुन्या वनाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार न येवू देता सतत तीन वर्षे विनासमस्येने वनक्षेत्राचा कारभार सुरळीत चालविला. मात्र नवीन वनाधिकारी रूजू होताच समस्यांचा डोंगर उंचावला. दर दिवशी निरनिराळ्या समस्या निर्माण होऊ लागल्या. झरण क्षेत्रातील वनकर्मचारी व जंगली मजुरांचा भ्रमनिराश झाला व झरण वनक्षेत्राचा कारभार चार महिन्यात ढेपाळला. मात्र त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली असून या क्षेत्रातील विविध समस्या व मजूर कर्मचारी उग्र रूप धारण करू लागले आहे. झरण विक्री आगार अस्थाव्यस्तझरण वनक्षेत्रात तोडण्यात आलेला लांब बांबू, बांबू बंडल, चापाटी बांबू तसेच इमारती लाकूड, बिट इत्यादी जंगलातून वाहतूक करून विक्री आगारात टाकण्यात आला. सदर वनउपज लिलावापूर्वी विक्री आगारात त्यांची योग्य रचना करणे आवश्यक आहे. मात्र डेपोत काम करणाऱ्या मजुरांचाही पगार न झाल्याने त्यांनी डेपोच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. सद्या झरण विक्री आगारात वनउपज विखुरलेला पडून आहे.