चिमूर : चिमूर शहरात नगर परिषदेची स्थापना होवून कामकाज सुरू झाले असून नगरपरिषद क्षेत्रात कार्यकर्त्यांनी संघटन कार्य करून सामाजिक कार्याकडे स्वत:ला झोकून देऊन सामान्य जनतेची कामे करावी. चिमूर येथील आपल्या कार्यकाळातील अपुर्ण कामे पूर्णत्वास जात असून अभ्यंकर मैदानावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेसच्याच माध्यमातून होणार असल्याची माहिती विधानसभेचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे शुक्रवारी दिली.यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू देवतळे, चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे, माजी सरपंच मनिष नंदेश्वर, माजी ग्रामपंचायत सदस्य तुषार काळे, महिला काँग्रेस अध्यक्षा सुरेखा अथरगडे, किशोर सिंगरे, सुनिल लोथे, माजी उपसरपंच बाळू बोभाटे, केशव सिरास, भरडकर, अभय नाईक, देवानंद गावंडे, माजी सरपंच राजू हिंगणकर, डॉ. बोढे होते. दरम्यान, भाजपाच्या सहकार क्षेत्रातील जुन्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. वडेट्टीवार समर्थकांत नवचैतन्य निर्माण जाले. उत्साह तयार होवून काँग्रेस बळकटीसाठी व भाजपात गेलेल्यांची घरवापसी होणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष राजू देवतळे यांनी सांगीतली. (तालुका प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांनी संघटनेसोबतच सामाजिक कार्य करावे
By admin | Updated: July 28, 2015 02:19 IST