नरेश पुगलिया यांचे आवाहन : सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेशचंद्रपूर : मानवी जीवनात वैद्यकीय शास्त्राने मोठी क्रांती केली आहे. यामुळे मानवी अवयवांचे प्रत्यारोपण करणे सुलभ झाले आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना याला साक्षी आहे. आपल्या अवयव दानातून एखाद्याचे जीवन सुकर होऊ शकते, यासाठी मनोनिग्रह घट्ट करा. अवयव दानाची समाजात जागृती करा, राजकारणासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासा, कार्यकर्त्यांनो सामाजिक बांधिलकीतून अवयव दानाचा संकल्प करा, असा संदेश देत माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अवयवदानाबद्दल आवाहन केले.चंद्रपूर येथील राजीव गांधी सभागृहात जिल्हाभरातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची सभा मंगळवारी पार पडली. मंचावर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन गावंडे, अॅड. अविनाश ठावरी, माजी आमदार बाबुराव वाघमारे, बिल्ट मजदूर सभेचे महासचिव वसंत मांढरे, नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढीया, उषा धांडे, नगराध्यक्ष छाया मडावी, डॉ. महावीर सोईतकर, डॉ. सुरेश महाकुलकर, विनोद अहीरकर, अशोक नागापुरे जि. प. सदस्य रामभाऊ टोंगे, बल्लारपूर पंचायत समिती उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.नरेश पुगलिया पुढे म्हणाले, आपण चंद्रपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले. येथील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मानवी देहाची गरज भासणार आहे. मात्र समाजाची देहदानाची मानसिकता दिसून येत नाही, ती बदलण्याची गरज आहे. भावनिक होऊन निर्णय घेवू नका. ज्येष्ठांचा व घरांच्याचा सल्ला घेवून अवयव अथवा देहदानाचा निर्णय घ्या. समाजात जागृती करा, प्रयत्नांचे बळ देण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)शुक्रवारी दानदात्यांची नोंदणी करणारकार्यक्रमात माजी खासदार नरेश पुगलिया यांनी स्वत:ची किडणी, हृदय व यकृत मरणोपरांत वैद्यक शास्त्राला दान करण्याचा संकल्प जाहीर केला. येत्या २० मे रोजी नवीन चंद्रपूर येथील श्री व्यंकटेश्वरा स्वामी मंदिर दाताळा रोड येथे दानदात्यांची नोंदणी करणार असल्याचे सांगितले. आयएमए वैद्यकीय चमूच्या माध्यमातून तपासणी करुन अवयव दानदात्यांचे नाव नोंदविले जाणार आहेत. स्वत:च्या इच्छेनुसार अवयव दानदात्यांनी अर्ज भरुन द्यायचा आहे. सामाजिक ऋण फेडण्यासाठी व मरणोपरांत इतरांना जीवन देण्यासाठी अवयव दाने करावे, अवयव दानकर्त्यांचा सन्मान करण्याचा मनोदय पुगलिया यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांनो, अवयवदानाचा संकल्प करा
By admin | Updated: May 18, 2016 00:49 IST