शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कामगारदिनी कामगारांची रॅली

By admin | Updated: May 3, 2017 00:51 IST

१ मे कामगार दिनाचे औचित्य साधून सीआयटीयूचे राज्य उपाध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांचे नेतृत्वात विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी गांधी चौकातून विशाल मोर्चा काढण्यात आला.

पालकमंत्र्यांना निवेदन : अनेक कामगारांची उपस्थिती

चंद्रपूर : १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून सीआयटीयूचे राज्य उपाध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांचे नेतृत्वात विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी गांधी चौकातून विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अंगणवाडी महिला, वनकामगार, मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगार, थर्मल पॉवर स्टेशन मधील कामगार तसेच आशा वर्कर हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी उपस्थित महिला व पुरुष कामगार दिन चिरायू होवो, महाराष्ट्र दिन चिरायू होवो, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहीजे, समान कामास समान वेतन मिळालेच पाहिजे, मानधन वाढ कमेटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, संघर्ष हमारा नारा है, भावी इतिहास हमारा है. अशा घोषणा देत मोर्चा विश्राम गृहापर्यंत नेण्यात आला. व आपल्या मागण्याचे निवेदन पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांना देण्यात आले. सदर निवेदनात राज्य शासनाद्वारे नियुक्त केलेल्या मानधनात वाढ कमेटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करुन अंगणवाडी महिलांना न्याय द्यावा, काम असेपर्यंत वन कामगारांना कामावर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करुन रोजंदारी कामगारांना कायम कामगारांचे वेतन द्या, मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात यावी, आशा वर्करला मोबदला देताना एपीएल बिपीएल भेद ठेवण्यात येऊ नये. कोल्हापूरच्या धरतीवर एपीएल महिले करिता मोबदला देण्यात यावा. मदतनिसांना पदोन्नती देतांना प्रभावाची अट रद्द करण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश होता. यावेळी मार्गदर्शनपर भाषणात राजनांदगाव वरुन आलेले गजेंद्र झा म्हणाले, कामगार दिन कामगारांना अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा देतो. नागपूर वरुन आलेले अरुण लाटकर म्हणाले, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०५ लोकांना बलीदान द्यावे लागले. हे आपणाला विसरुन चालणार नाही. मधुकर भरणे म्हणाले, चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातून तसेच नागपूर आणि वर्धेवरुन अनेक अंगणवाडी महिला मोर्चात सहभागी झाल्या ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे आभार शोभा बोगावार यांनी मानले. यावेळी जिल्ह्याबाहेरील आशा वर्करची उपस्थिती होती.( नगर प्रतिनिधी)