शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिक एल्गारच्या विरोधात पत्रकारांची धडक

By admin | Updated: August 26, 2015 00:44 IST

सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्रमिक एल्गार संघटनेच्या विरोधात मंगळवारी जिल्ह्यातील पत्रकारांनी काढलेल्या मोर्चाने इतिहास घडविला.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा : जिल्हाभरातील पत्रकार उतरले रस्त्यावरचंद्रपूर : सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्रमिक एल्गार संघटनेच्या विरोधात मंगळवारी जिल्ह्यातील पत्रकारांनी काढलेल्या मोर्चाने इतिहास घडविला. लोकमतचे सावली येथील तालुका प्रतिनिधी उदय गडकरी आणि लोकमतच्या संपादकांविरूद्ध श्रमिक एल्गार संघटनेच्या नेत्या अ‍ॅड. पोरोमिता गोस्वामी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सहा पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. या निषेधार्र्थ मंगळवारला जिल्ह्यातील शेकडो पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून निषेध नोंदविला. श्रमिक एल्गारने सहा ठिकाणी दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्यात याव्या, पत्रकारांना कायद्याचे संरक्षण देण्यात यावे व पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणावा, अशी मागणी विविध पत्रकार संघटनांच्या विविध प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ, चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ, ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा पत्रकार संघ (रजि.), चंद्रपूर इलेक्ट्रॉनिक मीडिया आदी पत्रकार संघटनांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. गिरणार चौकातून निघालेल्या मूक मोर्चात चिमूर, वरोरा, भद्रावती, घुग्घुस, माजरी, राजुरा, जिवती, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, सावली, गडचांदूर, मूल, गोंडपिंपरी, बल्लारपूर, सिंदेवाही, कोरपना, नागभीड येथील शेकडो पत्रकारांनी सहभाग नोंदविला. यात प्रामुख्याने चिमूर तालुका पत्रकार संघ, महाराष्ट्र पत्रकार संघ वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, यासह सर्व तालुका पत्रकार संघाचा प्रामुख्याने समावेश होता. १२ वाजता गिरणार चौक येथून निघालेला मूक मोर्चा दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. पत्रकारांच्या शिष्ठमंडळाने प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात जावून २० कलमी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना निवेदन दिले आणि चर्चा केली. शिष्टमंडळामध्ये विविध पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. गोस्वामींवरच गुन्हा दाखल का करु नये?उदय गडकरी यांनी लिहिलेल्या वृत्त विश्लेषणात एखाद्याची बदनामी व्हावी, असे काहीच नाही. तरी देखील सहा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. पत्रकारितेत प्रशंसा करणारे लिखाण होत असताना बरेचदा एखाद्याच्या चुका निदर्शनास आणून देण्यासाठी टीकात्मक लिखाण करावे लागते आणि त्यालाही आधार असतो. असेच लिखाण गडकरींनी केले. परंतु, पोलिसात तक्रार दाखल करुन यासंदर्भातील प्रतिक्रिया अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी नोंदविली. आमच्या लेखी या तक्रारी खोट्या स्वरुपाच्या आहेत. त्यामुळे खोटी तक्रार दाखल केली म्हणून श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्यावरच का गुन्हा दाखल करण्यात येवू नसे, असाही एक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.