शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कामावरून काढलेल्या कामगाराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:44 IST

जीएमआर पॉवर प्लॅन्ट या कंपनीत कार्यरत असलेल्या व नंतर त्याला कामावरून कमी केलेल्या कामगाराने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना गुरुवारी रात्री घडली.अक्षय आंबटकर (२३) रा. बाबुपेठ असे सदर कामगाराचे नाव आहे.

ठळक मुद्देजीएमआर कंपनीत होता कार्यरत

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जीएमआर पॉवर प्लॅन्ट या कंपनीत कार्यरत असलेल्या व नंतर त्याला कामावरून कमी केलेल्या कामगाराने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना गुरुवारी रात्री घडली.अक्षय आंबटकर (२३) रा. बाबुपेठ असे सदर कामगाराचे नाव आहे.न्याय मागण्यासाठी आंदोलन केले, याची शिक्षा म्हणून वरोरा येथीलजीएमआर पॉवर प्लॅन्ट व्यवस्थापनाने तब्बल ८६ कामगारांना कामावरुन काढून टाकले. कंपनीच्या या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात लढा देणाऱ्या जीआर पॉवर प्लॅन्ट कामगार संघटनेच्या तक्रारीवरुन हे प्रकरण मंत्रालयात पोहचले होते. ८६ कामगारांना एकाच वेळी कामावरुन कमी करुन टाकल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात अनेकदा जिल्हाधिकारी, जिल्हा कामगार आयुक्तांकडे जीएमआर पॉवर प्लांट कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांच्या नेतृत्वात दाद मागितली. मात्र कुणीही कामगारांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. यासंबंधीची तक्रार विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान, या कामगारांपैकी अक्षय आंबटकर याने गुरुवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जीएमआर पॉवर प्लांट कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.