शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिक एल्गारला भाजपची फूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:40 IST

माजी आमदार बाळू धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू नये म्हणून भाजपने खोटा प्रचार केला होता. आता जनतेचा पाठिंबा मिळत असल्याने भाजपच्या पायाखालची वाळू घसरू लागली. त्यामुळे सत्य दडपण्यासाठी भाजपकडून पुन्हा खटाटोप सुरू आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देपत्रकार परिषदेत आमदार विजय वडेट्टीवार यांचा पलटवार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : माजी आमदार बाळू धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू नये म्हणून भाजपने खोटा प्रचार केला होता. आता जनतेचा पाठिंबा मिळत असल्याने भाजपच्या पायाखालची वाळू घसरू लागली. त्यामुळे सत्य दडपण्यासाठी भाजपकडून पुन्हा खटाटोप सुरू आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.आ. वडेट्टीवार म्हणाले, काँँग्रेसचे उमेदवार धानोरकर यांना पीरिपा, रिपाइं, शेकाप, गोंडवाना गणतंत्र पार्टी, कम्युनिष्ट पार्टी व मनसेने समर्थन दिले आहे. लोकसभा मतदार संघातील जनतेकडून मोठा पाठिंबा मिळत असल्याने भाजप उमेदवाराचा पराभव दिसत आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल करणे सुरू झाले.श्रमिक एल्गार व स्वामिनी या संघटना दारूचा विषय पुढे करून काँग्रेसचे उमेदवार धानोरकर यांना विरोध करीत आहेत. या विरोधाला भाजपची फूस आहे. स्वामिनी ही संघटना तर भाजपची बी टिम असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकसभा मतदार संघासाठी केंद्राने १३ हजार ८०० कोटींचे पॅकेज दिल्याचे भाजपचे उमेदवार हंसराज अहीर सांगत आहेत. त्यांनी हा निधी कुठे खर्च केला, हे जनतेला सांगावे, अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी केली. यावेळी आमदार ख्वाजा बेग, मनोहर पाऊणकर, नंदू नागरकर, प्रकाश देवतळे, राकेश रत्नावार आदी उपस्थित होते.

राहुल गांधी आज चंद्रपुरातअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी दुपारी २ वाजता चांदा क्लब ग्राऊंंडवर जाहीर सभा होणार आहे. या सभेत प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आ. विजय वडेट्टीवार यांनी दिली.हेलिपॅडप्रकरणी तक्रार करणारराहुल गांधी यांच्या सभेसाठी हेलीपॅडला परवानगी देण्यास प्रशासनाने जाणीवपुर्वक दिरंगाई केली. हा सर्व प्रकार सरकारच्या दबावामुळेच घडला आहे. सभा होऊच नये, याकरिता मंत्र्यांनी दबाव टाकला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय जाधव यांच्याविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू, अशी माहिती माहिती आ. वडेट्टीवार यांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार