शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कामगारदिनी कामगार चढले टॉवरवर

By admin | Updated: May 2, 2017 00:58 IST

मागील पाच महिन्यापासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जीएमआर कंपनीतील कामगार वारंवार निवेदन देत होते.

वरोरा : मागील पाच महिन्यापासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जीएमआर कंपनीतील कामगार वारंवार निवेदन देत होते. त्यातील काही कामगारांना कंपनीने सेवेतून काढून टाकले. याच्या निषेधार्थ व मागण्या कंपनीने मान्य कराव्यात, याकरिता जीएमआर कंपनीचे सात कामगार कामगारदिनी वरोरा शहरातील अंबादेवी वॉर्डातील भ्रमणध्वनीच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरु केले.जीएमआर पॉवर कामगार संघटना वरोराचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांच्या नेतृत्वात मागील पाच महिन्यापासून कामगारांनी विविध मागण्याकरिता आंदोलन सुरु केले आहे. वारंवार कंपनी व प्रशासनाला निवेदन दिले. मात्र कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. मागण्यामध्ये स्थानिक कामगारांची परप्रांतात केलेले स्थानांतरण रद्द करण्यात यावे, वेतनाची स्लीप देण्यात यावी, पीएफ कपात करण्यात यावे, कंपनी कायदा १९४८ नुसार अंमलबजावणी करण्यात यावी, कामगारांना बोनस देण्यात यावा, १२ तासांऐवजी आठ तास काम द्यावे, कंत्राटी कामगारांना कंपनीने सामावून घ्यावे, कंत्राट पद्धत बंद करावी आदींचा समावेश आहे. या मागण्यांसाठी कामगारांनी पाच महिन्यापासून जीएमआर कंपनी व प्रशासनास निवेदन दिले. प्रशासनासोबत चर्चा केली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. उलट अनेक कामगारांना सेवेतून काढून टाकले. त्यामुळे आज सोमवारी कामगार दिनी सुरेंद्र बन्सोड, अजय पेंदोर, अमोल ठोंगे, भूषण उमरे, राजू मोहुर्ले, सुनील कुमरे, दिलीप कुत्तरमारे, मंगेश करंबे हे कामगार टॉवरवर चढून आंदोलन सुरु केले. कामगारांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर कामगार संघटना आंदोलन आणखी तिव्र करणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)